पूर्वी दंडात घालण्याच्या दागिन्यात अंगद व केयूर हे दोन दागिने प्रमुख असत. हे अलंकार रत्नजडित सुवर्णाचे असत. यांतल्या काहींचा आकार वेलींसारखा व काहींचा मकरासारखा असून वरची बाजू टोकदार असे. काहीच्या दोन्ही तोंडास सिंहाचे मस्तकही घडविलेले असत .
केयूर हा अलंकार जडावाचा केलेला असतो तो मुख्यत्वे उजव्या दंडात घट्ट बसवितात.केयूरला सोबत गोंडा असतो. तो नसला की त्याला अंगद म्हणतात.
हि पूर्वी घालावयाची आभूषणे असली तरी आता “बाजूबंद” म्हणून प्रचलित आहे.
“बाजूबंद” हा दंउंडामध्ये घालण्याचा पारंपरिक दागिना आहे. सोने किंःवा चांख्दीमध्ये मोती जडवून हा दागिना तयार करतात. आता जास्त प्रमाणात बाजूबंद मोत्यांचे असतात. हा अलंकार खांदा आणि हाताचा कोपरा यादरम्यान घालतात.
“बाजूबंद” या प्रकारात एक पट्टी असते व त्याचा मध्यभागी गोल फुलासारखी नक्षी असते.त्या फुलावर एक माणिकसारखे रत्न बसवलेले असते.त्याला बांधण्यासाठी दोरी असते. बाजूबंद घालण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे बाजूबंद फक्त हृदयाचीच कार्यक्षमता वाढवत नाही तर खांदा व हात यांची वेदनांपासून सुटका करतो. बाजूबंद घालणारी स्त्री संयमी बनते, असे मानतात.
असा हा सालंकूल अलांकरातील एक महत्वाचा पारंपारिक दागिना होय.
Leave a Reply