आपली भारतीय संस्कृती ही सर्वतोपरी श्रेष्ठ आहे. त्यात अध्यात्म तर आहेच शिवाय वैज्ञानिक दृष्टिकोन ही आहे.
सौभाग्यलेणं यामध्ये सर्व प्रथम पहिला मान किंवा महत्व “हळदी कुंकू” यांस आहे. कुंकुमतिलकाचा अलंकार अगदी लहानपणापासूनच लाभतो. कुंकू हे सौभाग्याचे प्रतिक तर हळद मांगल्याचे प्रतीक मानले जाते.
कोणत्याही मंगल कार्याची सुरुवात ही हळदी पासून सुरू होते. सुवासिनी स्त्रियांच्या ओटी मध्ये मुद्दाम हळकुंड घालण्याची प्रथा आहे. त्यामागे वैज्ञानिक कारणही आहे. हळद ही गर्भाशयासाठी अत्यंत उपयुक्त असते.
कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे. लग्न झालेल्या स्त्रियांना आवर्जून हळदी कुंकू लावले जाते. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांनी कपाळी कुंकू धारण करणे म्हणजे उगवत्या सूर्याचे प्रतीक मानले जाते. एकप्रकारे नकळत ती आत्म्याला जागृती मिळाल्याचे सांगत असते.
काळानुरूप हळदी कुंकू यात बदल झाला असला आणि कुंकवाची जागा आता टिकलीने घेतली तरीही पारंपरिक वेशभूषा केल्यावर आजही हळदी कुंकू आवर्जून लावले जाते हे काही कमी नाही.
हळदी कुंकवाचा उपयोग प्रत्येक सण, व्रतामध्ये ,मंगल उत्सवामध्ये असतो. तसेच हिंदूंच्या घरोघरी ,देव्हाऱ्यामध्ये हळदीकुंकू असतेच असते.
वेगवेगळ्या ठिकाणी कुंकवाचा प्रकार वेगवेगळा असलां तरीही उद्देश एकच आहे.
तसेच आई जगदंबेस कुंकू अत्यंत प्रिय आहे. तुळजाभवानी आईचा, महालक्ष्मीचा हळदी कुंकवाने मळवट भरला जातो. बऱ्याच ठिकाणी देवी मातेस कुंकूमार्चन केले जाते.
असे हिंदू संस्कृती मध्ये हळदी कुंकवाचे महत्व अधोरेखित होते. जे धर्म जागृतीचे महत्वाचे कार्य बजावते.
Leave a Reply