जोडवी हा मंगळसूत्रानंतर घातला जाणारा सौभाग्यलंकार आहे. सप्तपदी दरम्यान नववधूच्या पायात जोडवी घालण्याचा स्वतंत्र विधी असतो. म्हणजेच मंगळसूत्र आणि जोडवी हे दोन अलंकार सौभाग्याचे प्रतिक मानले जातात. ते आयुष्यभर ठेवण्याची प्रथा आहे.
जोडवी हा सौभाग्य अलंकार ही चांदीचा असतो. यालाही पैंजणा प्रमाणेच वैज्ञानिक आधार आहे. शरीरातील उष्णता चांदीमुळे कमी होते.
जोडवी ही पायाच्या अंगठ्याच्या शेजारच्या बोटात परिधान करतात. पारंपरिक जोडवी ही वळ्याच्या स्वरुपात असायची आता वेगवेगळ्या आकारात आणि नक्षीमध्ये सुद्धा मिळतात.
पायात जोडवी घालण्यामागे अनेक कारण असतात. जोडवी ज्या बोटात घालतात त्याचा संबंध मणक्याशी, कमरेशी, कानाशी असतो. तसेच संपूर्ण शरीराची ताकद पायात असते ती शक्ती आणि ऊर्जा पायाद्वारे बाहेर पडू नये म्हणून जोडवी घालतात.
दुसरे महत्वाचे कारण म्हणजे जोडवी किंवा तत्सम अलंकार पायात घातल्याने प्रसूत वेदना कमी होतात. ताप येणे आणि चक्कर येणे या बाधा सहसा होत नाहीत.
असा हा महत्त्वाचा सौभाग्य अलंकार प्रेमाचे, पतीव्रतेचे प्रतिक आहे. त्यामुळे प्रत्येक सुवासिनी स्त्रीस मिळालेलं पवित्र सोभाग्यलेणंच होय.
Leave a Reply