आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जन्माच्या काही दिवसात “कान टोचणे ” म्हणजेच कर्णवेध संस्कार केले जातात. सोनारकडून कान टोचून घेणे यामागेही धर्मशास्त्रात अनेक कारणं आहेत.
ज्या जागी कान टोचले जातात त्याचा संबंध आपल्या पाचनसंस्थेशी आहे. तसेच श्रवण शक्ती चांगली राहते असंही म्हणतात.
“कर्णभूषण” या अलंकरांमुळे स्त्रियांच्या सोंदर्याला आणखीनच बहार येते.
कर्णभूषणांचे दोन प्रकार :
(१) कानाच्या वरच्या भागात घालावयाचे कर्णभूषण; यास कर्णिका म्हणत.
(२) कानाच्या खालच्या पाळीत घालावयाचे कर्णभूषण; यास कुंडल म्हणत. पूर्वीच्या काळी स्त्रियांची व पुरुषांची वेगवेगळी कर्णभूषणे असून त्यांना विविध नावे असत. गोलाकार व नक्षीदार कुंडलांना मकरकुंडले म्हणत.
चंद्रकोरीप्रमाणे असलेली पृष्ठकुंडल कर्णभूषणे अमरावतीच्या शिल्पात विशेष प्रमाणात आढळतात. अजिंठा येथील लेण्यांत गोलाकार कर्णभूषणे दिसतात. लंकेतील स्त्रिया कुंडले वापरीत व त्यांत हिरे बसविलेले असत, असा उल्लेख रामायणात आहे. कुंतीपुत्र कर्ण याला सूर्यापासून कवच-कुंडले मिळाली होती, असा उल्लेख महाभारतात आढळतो.
महाराष्ट्रात पूर्वी स्त्रिया बाळ्या, बुगड्या, वेलभोकरे, लवंगा किंवा अनेक प्रकारच्या कुड्या घालीत.
वेगवेगळ्या भागात त्या त्या पद्धतीचे कर्णभूषण आजही वापरले जाते.
असा हा कानाशी संबंधित अलंकार आपलं सौंदर्य वाढवण्यासाठी तर घालवाच त्याचबरोबर शरीर स्वास्थ्यासाठी तर जरूर घालावा.
Leave a Reply