सौभाग्य अलंकारातील सुवासिनी स्त्रियांचा सर्वात जवळचा आणि महत्त्वाचा दागिना म्हणजे “मंगळसूत्र”.
हा एकमेव अलंकार किंवा लेणं ज्यावर सौभाग्यवती स्त्रियांचा अधिकार असतो. हा अलंकार प्रत्येक स्त्रीचा अतिशय जवळचा आणि भाग्याचा मानला जातो. कित्येक आठवणी या अलंकाराशी जोडलेल्या असतात. त्यामुळे भावनिक आणि मानसिक आधार देणारा हा दागिना होय.
मंगळसूत्रातील काळे मणी आणि दोन वाट्या हे एका सूत्रात बांधलेले असतात,याचाच अर्थ प्रत्येक सुवासिनी स्त्रीने पतीसह कुटुंबाला एक सूत्रात बांधण्याची जबाबदारी आनंदाने पार पाडावी असाही होतो. यामुळे ते कुटुंब आनंदी तर राहतेच त्याबरोबरच भरभराटीस येते असंही म्हणतात.
मंगळसूत्रातील दोन वाट्या या सासर आणि माहेरचे ही प्रतीक असतात.तसेच काळे मणी हे संसाराला कोणाचीही दृष्ट लागू नये यासाठी असतात.
हा अलंकार गळ्यात पडल्यावर स्त्रीचे रूपच बदलते त्यामुळे तिच्या तेजात आणखीनच भर पडते.
या दागिन्यातच मंगल म्हणजेच शुभ लक्षण सामावलेलं आहे. असा हा मांगल्याचे प्रतिक असलेला दागिना सर्वात श्रेष्ठ ठरतो आणि म्हणूनच हृदयाच्या अगदी जवळ असतो .
Leave a Reply