“नथ” हा एक पारंपारिक दागिना होय. महाराष्ट्रात हा अलंकार जास्त वापरला जातो. पूर्वीच्या काळी नथ फक्त सोन्याची असायची परंतु काळानुरूप तिचे स्वरूपही बदलले आहे.कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा “नथ” हा सुवर्ण अलंकार आपण पाहिला असेलच.
“नथ “हा फक्त सौंदर्य खुलवणारा दागिना नसून स्त्रीस तिच्या जबाबदारीची जाणिव करुन ठेणारा अलंकार असे म्हणू. तसेच वैज्ञानिक दृष्ट्या नाकातल्या नथीचा गर्भाशयाशी संबंध असतो. नथ घातल्याने प्रसव वेदना कमी होतात ,असं जुन्या जाणत्या लोकांचं ठाम मत आहे.
नथ हा स्त्रीचा हळवा कोपरा असला तरी हा दागिना म्हणजे आत्मसन्मान, इज्जत आणि शौर्यही दर्शवतो…
नथ घालून मिरवणारी स्त्री जितकी अलवार देखणी, तितकीच ती प्रसंगी रणरागिणी सुद॒धा होते. अशी ही “नथ”स्त्रीचे सौंदर्य तर खुलवते ,जबाबदारीची जाण सुद्धा देते नाही का….
Leave a Reply