स्त्रियांच्या पायातील पैजण हा एक अलंकार अगदी लहान वयापासून पायात घातला जातो. पायातील पैंजण लहान मुलांना घालतात त्याला वाळे म्हणतात. वाळे लहान मुलं ,मुली दोघांनाही घालावयाचा अलंकार आहे.
वयात आलेल्या मुलींना पायात आवर्जून पैंजण घातले जातात. यामागे सौंदर्य वाढवणे हा उद्देश्य नसून इतरही कारणं असतात.
पैंजण हा अलंकार चांदीचा असतो. संपूर्ण शरीराची उष्णता चांदी मुळे कमी होते ती पैंजणामुळेच. सोनं पायात घालत नाहीत कारण त्यामुळे शारिरीक उष्णतेचे संतुलन बिघडून अनेक आजार बळावतात .
पैंजण हा शारिरीक विद्युत ऊर्जा संरक्षित करतो.त्याचबरोबर पैंजणामुळे शरीरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. अजून महत्त्वाचं कारण म्हणजे स्त्रियांच्या ओटी पोटासंबंधी आजार ही कमी होतात. इतकंच नाही तर पायाची हाडं ही मजबूत होतात.
पैंजणाचे ही अनेक प्रकार असतात. यातही वेगवेगळ्या भागात प्रकार आणि आकार वेगवेगळे आढळतात.
अश्या प्रकारे पैजण हा अलंकार आरोग्याचा पायाच मजबूत करतात शिवाय वातावरणात मंजूळ नाद निर्मितीतून सुमधुरता आणण्याचे कार्य करतात.
Leave a Reply