ताम्हण (किंवा तामण, जारूळ बोंद्रा / बुंद्रा या नावांनीही परिचित) (शास्त्रीय नाव : Lagerstroemia speciosa किंवा Lagerstroemia reginae) हा मेंदीच्या कुळातील मध्यम आकाराचा हा वृक्ष आहे. आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया या खंडांतील जंगलांच्या सर्व प्रकारांत आढळतो. पश्चिम महाराष्ट्रातील पानगळीच्या जंगलात, कोकणात नदीनाल्याच्या काठाने व विदर्भातही सर्वत्र दिसतो. जारूळ, अर्थात ताम्हणाचा वृक्ष भरपूर पाणी मिळणाऱ्या जागी वाढतो. चांगली उंच वाढणारी झाडे फणसाडच्या व रत्नागिरीच्या जंगलात दिसतात. मुंबईत अनेक ठिकाणी ही झाडे दिसतात. हा फुले देणारा वृक्ष आहे. या वनस्पतीला फुले साधारणपणे १ मेच्या सुमारास म्हणजेच महाराष्ट्र दिनी येत असल्याने याचे फूल महाराष्ट्राचे राज्यपुष्प आहे. तामणाचे फूल लालसर-जांभळ्या रंगामुळे ओळखले जाते. भरपूर पाणी मिळणाऱ्या ठिकाणी तामणाचे वृक्ष वाढतात. कोकणात या वृक्षाला ‘मोठा बोंडारा’ असे म्हणतात. ताम्हण वृक्षाची पानेताम्हण असेही म्हणतात. या वृक्षाची फळे कोकणात सर्वत्र नदी-नाल्यांच्या काठांवर, बंगाल, आसाम, म्यानमार, दक्षिण भारत, अंदमान निकोबार आणि श्रीलंकेतील जंगलांमध्येही ते आढळतात. सर्वसाधारणपणे हा वृक्ष मध्यम आकाराचा, गोलसर, डेरेदार, पर्णसंभाराने शोभिवंत दिसतो.
याच्या लहान झाडालाही फुले येतात. तामण हा रस्त्याच्या कडेने सावलीसाठी लावण्यास उत्तम वृक्ष आहे.
लॅगस्ट्रोमिया (Lagerstroemia) हे नाव स्वीडिश बॉटॅनिस्ट मॅगलॅगस्टोम यांच्या सन्मानार्थ दिले गेले आहे. रेजिनी (raginae) म्हणजे राणीचा. स्पेसिओसा (speciosa) म्हणजे अतिशय सुंदर. ताम्हण हे महाराष्ट्राचे राज्यपुष्प! ते जारूळ किंवा बोंडारा या नावांनीदेखील ओळखले जाते.
झाडाची अन्य नावे:
मराठी – मोठा बोंडारा
इंग्रजी – क्वीन्स क्रेप, प्राइड ऑफ इंडिया, जायंट क्रेप
हिंदी – जरूल, अर्जुन
बंगाली – जारूल, अजहार
लॅटिन – लॅगस्ट्रोमिया रेजिनी/फ्लॉस रेजिनी
बहरण्याचा हंगाम : पानगळीचा वृक्ष असल्याने पानगळ फेब्रुवारी, मार्च महिन्यात होते. एप्रिलपासून नवीन पालवी फुटायला सुरुवात होते, त्यानंतर फुलोरा येतो कधी कधी तर पालवी व फुलोरा एकदमच येतो. फुले नाजूक मुलायम असतात. खालून वर टोकाकडे उमलत जातात. फुलोरा फांद्याच्या टोकाला येतो. एक फुल ५-७ सेमी आकाराचे. झालरीसारख्या पाकळ्या असणारे असते. पाकळ्यांचा रंग जांभळा, लव्हेंडर असतो. गुलाबी किंवा फिकट गुलाबी रंगाची फुले असणारे तामण वृक्षही आढळून येतात. फूल दिसायला सुंदर असल्यामुळे त्याला महाराष्ट्राचे राज्यपुष्प हा मान मिळाला असावा. फुलांचा बहर उन्हाळ्यात सुरू होतो. दोन, तीन महिने टिकतो. जर झाडाला व्यवस्थित पाणी मिळाले तर फुलांचा बहर वर्षातून दोनदा येऊ शकतो. एप्रिल ते जून महिन्याच्या रखरखत्या ऊन्हातही हे फूल सर्वांचे लक्ष वेधून घेते.
ताम्हणाचे झाड सरासरी दहा ते वीस मीटर उंचीचे असते. भारतात त्याचा वापर अधिकतर शोभेसाठी केला जातो. रायगड जिल्ह्यात माणगाव येथे ताम्हणाचा अंदाजे शंभर फुट उंचीचा वृक्ष आहे.
ते झाड मे-जूनच्या दरम्यान फुलून येते. त्याला कोकणात ‘मोठा बोंडारा’ असेही म्हणतात. कोकणात नदी-नाल्यांच्या काठांवर ताम्हणाची भरपूर झाडे दिसतात. बंगाल, आसाम, दक्षिण भारत, अंदमान निकोबार आणि श्रीलंकेतील जंगले येथे ताम्हणाची झाडे आहेत. हा वृक्ष म्यानमार, मलाया, चीन या देशांत नदीकाठी आणि दलदलीच्या भागात मोठ्या प्रमाणावर आढळतो.
फुलाचे वैशिष्ट्य: हे फूल पूर्ण उमलल्यावर सहा-सात सेंटिमीटर व्यासाचे होते. झालरीसारखी दुमड असणाऱ्या सहा किंवा सात नाजूक, तलम चुणीदार पाकळ्या हे या फुलाचे वैशिष्ट्य. फुलातील रंगसंगती अप्रतिम असते. शांत, शीतल, प्रसन्न रंगाच्या पाकळ्या, त्यांच्या मध्यभागी विरुद्ध रंगाचे (कॉन्ट्रास्ट कलर) पिवळेधमक नाजूक पुंकेसर, पुंकेसरांची संख्या अनिश्चित पण २० पेक्षा जास्त असते. फुलांची रंगछटा जमीन, पाणी हवामान अशा घटकांनुसार बदलू शकते.
झाडाची संरचना: खोडा-फांद्यांची साल पिवळसर, करड्या रंगाची, गुळगुळीत असते. पेरूच्या झाडाच्या सालीसारखी ती दिसते. सालीचे पातळ, अनियमित आकाराचे पापुद्रे निघून गळून पडतात. त्या ठिकाणी फिकट रंगाचे चट्टे पडतात. पाने संमुख, साधी, मोठी, लांबट, लंबगोल; पण टोकदार असतात. ती वरच्या बाजूने गडद हिरवीगार; तर खालून फिकट हिरवी दिसतात. हिवाळ्यात पानगळ होताना ती तांबट रंगाची होतात. झाडाचे हे रूपही अत्यंत मनोहारी असते. वसंत ऋतूची चाहूल लागताच नवीन पालवी फुटू लागते. साधारणपणे पालवीबरोबर किंवा आगेमागे फुलांचा बहर सुरू होतो. २५-३० सेंटिमीटर लांबीचे फुलोरे फांद्यांच्या शेंड्यांजवळ येऊ लागतात. फुले खालून वर टोकाकडे उमलत जाणारी जांभळ्या रंगाची; अतिशय देखणी दिसतात.
उपयोग: झाडाचे लाकूड उंच, मजबूत, टिकाऊ, चमकदार लाल रंगाचे असून सागाला पर्याय म्हणून वापरले जाते. लाकडावर उत्तम प्रकारे कोरीवकाम करता येते. समुद्राच्या खाऱ्या पाण्याचा लाकडावर परिणाम होत नाही. ते लवकर कुजतदेखील नाही त्यामुळे बंदरामध्ये खांब रोवण्यासाठी व बोटीसाठी वापरतात. ताम्हणाच्या वृक्षाचे औषणी गुणधर्मही आहेत. ताप आल्यास या झाडाच्या सालीचा काढा दिला जातो. तोंड आल्यास ताम्हणाचे फळ तोंडाच्या आतून लावले जाते. ताम्हणाच्या पानांत-फळांत ‘हायपोग्लिसेमिक’ हे द्रव्य असते. ते मधुमेहावर गुणकारी आहे. तसेच पोटदुखीवर इलाज आणि वजन कमी करण्यासाठी या झाडाचा उपयोग केला जातो. त्याचे लाकूड लालसर रंगाचे, मजबूत, टिकाऊ, चमकदार असते. टिकाऊपणा आणि उपयोग याबाबतीत ताम्हण सागवानाच्या झाडाशी स्पर्धा करतो. त्याचा वापर इमारती, पूल आणि विहिरीचे बांधकाम, जहाजबांधणी, रेल्वे वॅगन; तसेच विविध प्रकारच्या वस्तू बनविण्यासाठी होतो.
ताम्हण फुलांना राज्य फुलाचा मान का मिळाला?
आम्ही वनस्पतींच्या शोधासाठी नेहमी कोकणात जात असू. ताम्हणाचे फूल अनेकदा दिसे. मात्र त्या फुलाला ताम्हण म्हणतात, याबाबत माहिती नव्हती. एकदा आम्ही उन्हातान्हात जंगल तुडवड चाललो होतो. गर्द सावली असलेल्या एका झाडाखाली आम्ही विश्रांती घ्यायला थांबलो. सहज वर लक्ष गेले. पाहतो तर अख्खे झाड फुलांनी नटलेले! ते झाड साधारण गोलसर, डेरेदार होते. खोडा-फांद्यांची साल पिवळसर, करड्या रंगाची, गुळगुळीत. पेरूच्या सालीसारखी! सालीचे पातळ, अनियमित आकाराचे पापुद्रे निघालेले होते. फिकट रंगाचे डाग पडलेले. पाने लांबट आणि टोकदार होती. पानांच्या अग्रभागाला रंग गडद हिरवा होता. तर पानाच्या उलट्या, अर्थात खालील बाजूचा रंग फिकट हिरवा होता. अगदी परफेक्ट कलर कॉम्बिनेशन! ते वेगळे फुलझाड बघायला मिळाल्याच्या आनंदात थकवा पळून गेला. मी गुराख्यांना त्या झाडाची ओळख विचारली. “याझलं ‘नाण्याचं झाड’ सांगत्या’, बाकी नाय ठाऊक!” एकाने जुजबी माहिती दिली. ”याला ‘बोंडारा’ म्हणत्यात भाऊ.” सरपणाची मोळी घेऊन निघालेली बाई म्हणाली. मला बोंडारा म्हणजेच ताम्हण हे माहिती होते. जारूळ, बोंडारा ही त्या झाडाची टोपण नावं आहेत. राज्यपुष्पाचे दर्शन झाले तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला. अनपेक्षितपणे या वृक्षाचे दर्शनाने आंम्ही भारावून गेलो. पण देशातल्या वनस्पतीशास्रातील अभ्यासकांनी ताम्हणाचे ‘प्राईड ऑफ इंडिया’ ज्याला भारताची शान म्हणूनही ओळखले जाते,असे सार्थ नामकरण केले आहे.
ताम्हनची निवड केवळ तिच्या निर्विवाद सौंदर्याबद्दल नव्हती. यात महाराष्ट्रीयन भावनेशी खोलवर प्रतिध्वनी करणारी अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्याचा लवचिक स्वभाव, विविध परिस्थितींमध्ये भरभराट करणारा, लोकांच्या मजबूत आणि जुळवून घेणाऱ्या आत्म्याचे प्रतिबिंब आहे. दीर्घकाळ टिकणारे बहर, महिनोनमहिने लँडस्केप सुशोभित करणारे, महाराष्ट्राच्या चिरस्थायी परंपरा आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहेत.
आपल्या सांस्कृतिक महत्त्वापलीकडे, ताम्हण महाराष्ट्राच्या पर्यावरणीय कल्याणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. त्याची दाट पर्णसंभार विविध वन्यजीवांसाठी सावली आणि निवारा प्रदान करते, राज्याच्या जैवविविधतेमध्ये योगदान देते. मजबूत मूळ (Roots) प्रणाली जमिनीची धूप रोखण्यास मदत करते, विशेषतः डोंगराळ प्रदेशात, जमीन आणि तिच्या संसाधनांचे संरक्षण करते. याव्यतिरिक्त, त्याचे दोलायमान बहर परागकणांना आकर्षित करतात, विविध वनस्पती परिसंस्थांच्या आरोग्यास प्रोत्साहन देतात. त्यामुळे ताम्हण यांना राज्यपुष्प म्हणून दिलेले पद हे केवळ प्रतीकात्मक नाही; महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आणि पर्यावरणीय कल्याणाशी त्याचा खोल संबंध असल्याचे ते मान्य करते. हे राज्याच्या समृद्ध वारशाची, लवचिक भावना आणि नैसर्गिक सौंदर्य जतन करण्याच्या वचनबद्धतेचे स्मरण म्हणून काम करते.
लँडस्केपला त्याच्या मोहक स्वरूपाने सुशोभित करते. चकचकीत, गडद हिरवी पाने त्याच्या फांद्या वर्षभर शोभतात, हिवाळ्यात पडण्यापूर्वी दोलायमान लाल होतात. ताम्हणचा मुकुट दागिना म्हणजे त्याचे आकर्षक फुलांचे पुंजके. उन्हाळ्याच्या उत्तरार्धात आणि शरद ऋतूच्या सुरुवातीस दिसणाऱ्या, या पॅनिकल्समध्ये असंख्य दोलायमान फुले येतात. फुले गुलाबी, जांभळा, अगदी पांढऱ्या रंगाच्या विविध छटांमध्ये येतात, ज्यामुळे रंगाचा चित्तथरारक स्प्लॅश येतो. त्यांचा विशिष्ट क्रेप सारखा पोत आणि लांब फुलण्याचा कालावधी त्यांना खरा दृश्य आनंद देतो. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही ताम्हण फुललेले दिसाल तेव्हा लक्षात ठेवा की ते फक्त एक सुंदर झाड नाही; हे महाराष्ट्राच्या अभिमानाचे आणि पर्यावरणीय जाणीवेचे प्रतीक आहे. म्हणूनच महाराष्ट्र सरकारने ताम्हणला १९९० मध्ये राज्य फुलाचा दर्जा दिला.
सांस्कृतिक आणि पारंपारिक महत्त्व: ताम्हणचे भारतामध्ये खोल सांस्कृतिक महत्त्व आहे. हे महाराष्ट्राचे राज्य फूल आहे, जे त्याच्या सौंदर्य आणि लवचिकतेसाठी आदरणीय आहे. हिंदू पौराणिक कथांमध्ये, ताम्हण फुलांनी ब्रह्मदेवाची पूजा केल्याने समृद्धी येते असे मानले जाते. दोलायमान फुलांचा उपयोग धार्मिक समारंभ, विवाहसोहळा आणि उत्सवाच्या सजावटीमध्ये केला जातो. त्याची उपस्थिती शुभ आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. काही प्रदेशांमध्ये, लाकडाचा वापर धार्मिक वस्तू आणि वाद्ये तयार करण्यासाठी केला जातो. महाराष्ट्राच्या चिरस्थायी परंपरा आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहेत. याव्यतिरिक्त, ताम्हणचे भगवान ब्रह्मदेवाशी असलेले धार्मिक संबंध ते राज्याच्या सांस्कृतिक परंपरेशी जोडतात.
पर्यावरणीय प्रभाव: ताम्हण अनेक प्रकारे पर्यावरणासाठी सकारात्मक योगदान देते. त्याची दाट पर्णसंभार पक्षी आणि इतर प्राण्यांना सावली आणि निवारा प्रदान करते. विशेषतः उतार आणि तटबंदीवर. फुलांचे झाड म्हणून ते मधमाश्या आणि फुलपाखरांसारख्या पराग कणांना आकर्षित करते, जैवविविधतेला प्रोत्साहन देते. दोलायमान बहर बागे आणि लँडस्केप्समध्ये सौंदर्य व लावण्य अधीकच खुलवतात.
भारतीय उपखंडातले ते फूल त्याच्या गुणांमुळे युरोप-अमेरिकेतही पोचले आहे.
डॉ. दिलीप केशव कुलकर्णी.
मोबा: ९८८१२०४९०४
२८. ०९. २०२४.
ताम्हण वृक्ष व फुले ह्यांची माहिती अतिशय सुंदर स्वरूपात लेखकाने मांडली आहे. आमच्या सॉसाइटी मधे ताम्हण फुलांची अनेक झाडे आहेत. फुलाने बहरलेलं झाडं अतिशय मोहक दिसते. लेख जरूर वाचावा. धन्यवाद!
डॉक्टर दिलीप कुलकर्णी यांनी ताम्हण वृक्षाविषयी खूप सखोल माहिती सांगितलेली आहे आणि त्याचा फायदा आपल्याला नक्कीच घेता येईल
🙏🙏🙏🙏🙏🙏
Nice article