हेमंत आणि शिशिर हे दोन थंड वातावरणाचे ऋतू शारीरिक सौंदर्य वाढवण्यासाठी खूप पूरक आहेत .
हल्ली स्त्री असो व पुरुष दोघांनाही शारीरिक सौंदर्य हवे असते .
यासाठी स्पा, युनीसेक्स सलोन , ब्युटी पार्लर अशा ठिकाणी हजारो रुपये उधळताना आजची तरुण पिढी दिसते ….
आता थंडीच्या मोसमात संत्री खूप मिळतात .
खाऊन झाली कि आपण त्यांची साले फेकून देतो .
ही साले आधी सावलीत मग कडक उन्हात वाळवाव्यात.
हाताने कुस्करल्यावार तूकडे पडत असतील हे पाहून त्यांचे बारीक चूर्ण करून ठेवावे .
हल्ली बरेच फेसवॉश मिळतात त्याऐवजी दोन चमचे संत्री साल + एक चमचा दुध एकत्र करून चेहऱ्याला चोळले असता बाजारातल्या कोणत्याही फेस वॉश पेक्षा जास्त चांगला गुण येतो .
नेहमीच्या फेस प्याक मधेही संत्री साल अशीच वापरू शकता .
अशाच पद्धतीने या चुर्णाने अंघोळीच्या आधी शरीराला मालीशसुद्धा करू शकतो ,या वेळी रक्तचंदन , वाळा आणि अनंतमूळ यांचे चूर्ण समप्रमाणात मिसळावे ..
एका शाही स्नानाचा अनुभव घरच्या घरी आणि फुकटात घेऊ शकता .
— वैद्य राहूल काळे ,आयुर्वेदाचार्य .
आयुःसिद्धी ,
कळवा (ठाणे )
संपर्क क्रमांक : 07506178981
Leave a Reply