नवीन लेखन...

सौंदर्याचा साक्षात्कार

सद्य:स्थितीत सर्वप्रथम धन, तन आणि मग मन असा प्राधान्यक्रम ठरत चालला आहे. आपल्याच मनाचा अनेकदा मनातल्या मनात, मनाप्रमाणे, मनमुराद काही वेळा मन मारूनही मनोमन आपण विचार करतोच असं नाही. शारीरिक सौदर्य खुलवणे हे जितकं आपल्याला प्रिय असतं, तितकंच किबहुना थोडं अधिकच मानसिक स्वास्थ्य मिळवणं आणि ते टिकवून ठेवणं जरुरीचं असतं. आपल्या स्वप्नातल्या व्यक्तिमत्वाचं वेगळेपण अनुभवताना आणि त्यासाठी जीवनशैली निवडताना आपल्या आशा, अपेक्षा, इच्छा. ईर्षा, उन्नती, संपन्नता यांच्या परिपूर्णतेसाठी प्रत्येक बाबींचा विचार करणं आवश्यक असतं.

खरं म्हणजे, आपली आणि आपल्या कुटुंबाची खरी ओळख आपआपल्या व्यक्तिमत्वावरूनच होत असते. आपली सजकता, सतर्कता आणि सौंदर्यदृष्टी यांचा मिलाफ आपण आपल्या जीवनात घडवून आणू शकतो. मनात घर करून राहिलेल्या आपल्या प्रतिमेला आपल्या मनाइतकंच सुंदर सजवायचं, खुलवायचं असतं. प्रतिमा छोटी असली तरीही चालेल पण त्याला सजवणारं मन मात्र मोठं असावं लागतं.

प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा संबंध त्या व्यक्तीच्या मानसिकतेशी निगडीत असतो. आपापली अपेक्षा, गरज, उपजत कलागुण, छंद, आवड, निवड, सवड, वैचारिक क्षमता, सामजिक स्थान, व्यावसायिक संबंध, कौटुंबिक आकार, शैक्षणिक पात्रता, आर्थिक कुवत तसेच याव्यतिरिक्त इतर सर्व लौकिक आणि अलौकिक गुण या सर्व बाबींवर आपलं व्यक्तिमत्व बाहय तसेच अंतर्गत कसं असू शकेल, हे ठरतं.

आपल्या राहणीमानात एकप्रकारे आपलं व्यक्तिमत्व ऐट आणू शकतं. कल्पक आणि सौंदर्यपूर्ण सकारात्मक विचार, आचार आणि व्यवहार करणारं मन निश्चितच आपल्या जीवनात सौदर्याचा साक्षात्कार घडवून आणू शकतं.

– विद्यावाचस्पती विद्यानंद

ईमेल : vidyavachaspati.vidyanand@gmail.com

Avatar
About विद्यावाचस्पती विद्यानंद 32 Articles
शिक्षण तज्ज्ञ, जेष्ठ पत्रकार, लेखक, साहित्यिक, व्याख्याते, स्तंभ लेखक, कवी, व्याख्याते, अभिनेते, मानसशास्त्रीय समुपदेशक, करिअर आणि आध्यात्मिक मार्गदर्शक. एकूण १८ पुस्तकांचे लेखन (पैकी ६ क्रमिक पाठ्य पुस्तके गेल्या ६ वर्षांपासून विद्यापीठातील अभ्यासक्रमासाठी उपलब्ध), २००० पेक्षा अधिक लेखांना विविध माध्यमांतून प्रसिद्धी, ३० वर्षे शैक्षणिक क्षेत्रांत प्राध्यापक, प्राचार्य आणि संचालक म्हणून योगदान, ३५ वर्षे वैविध्यपूर्ण व्यवसायातील अनुभव, निरनिराळ्या विद्याशाखांमधून एकूण २८ पदवी व पदव्योत्तर शिक्षण तसेच २ विषयांमध्ये पी. एच. डी. (मानसशास्त्र व व्यवस्थापनशास्त्र), सद्यस्थितीत तिसऱ्या पी. एच. डी. चे (आध्यात्म विषयांत) काम सुरु.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..