ज्यासाठी तळमळ मी केली,
तो भारत ना हा, अन्य
मज अभिप्रेत होता तो
बलदंड हिंदुस्तान ।।
ओढता कोलूचा दांडा,
रक्ताने भिजली पाठ,
संपूर्ण स्वराज्य रविचि,
होईल उद्या पहाट ।
हे स्वप्न मनींचे माझ्या,
लाविले कुणी उधळून ।।
तुकड्यांची बांधून मोट,
जाळीले जयांनी पोट,
त्यासाठी नव्हती धरिली
मी अंदमानची वाट ।
दुबळ्यांनी मम मातेला,
टाकले करुनी भग्न ।।
ती सुजलां सुफलां होती,
ती सस्य शामला होती,
पेराल तेथे उगवावे,
मातीत टपोरे मोती ।
ती घेऊनी झोळी हाती,
फिरतेस आज अन्नान्न ।।
लाचारा भ्रष्टाचारा
मिळतसे आज सन्मान ।
न्याय नीती त्याग मूल्यांचा
होतसे सदा अवमान ।
परक्यांच्या पायी आम्ही
ठेवली सुबुद्धी गहाण ।।
— सुधा मोकाशी
Leave a Reply