सवय तुझी मनाला मोहक झाली
आठवण तुझी अंतरी व्याकुळ करुन गेली
इतकं कस रे सहज सार तुटलं
बावर मन अलगद तुझ्यात बहरल
सुन्या आकाशात चंद्र ही लपला
तुझ्या आठवणीत भाव ओलावला
अशी कशी रे तुझी ओढ आल्हाद लागली
त्या राधेची प्रीत फक्त कृष्णालाच कळली
इतकं कस मन तुझ्यात अलवार गुंतल
तुला तरीही अंतरी प्रेम नाही कळलं
असा कसा तुझ्यात जीव गुंतला
तू मात्र किनाऱ्यावर दूर अवचित गेला
अशी कशी आस हरवून गेली
आठवणीत ही तुझ्या मी न राहिली
अस कस मन तुला नाही कळलं
तुझ्या मिठीतील चांदण हलकेच हरवलं
अशी कशी तुझी सय छळून मज जाते
कळेल का रे तुला तुझी आठवण छळते
असे कसे अश्रू वाऱ्यावर विरले
तुझे सूर इथे तिथे हरवून गेले
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply