बऱ्याच वर्षांपासून काही मंडळी पैश्याच्या हव्यासापोटी रक्कम दुप्पट, तिप्पट होण्याच्या फसव्या जाहिरातीच्या आमिषांना बळी पडून कुठेही आपली कष्टार्जित पुंजी भविष्यातील सुरक्षितेचा विचार न करता गुंतवणूक करतांना आढळतात. तरी मित्रांनो पैशाची गुंतवणूक करतांना जरा जपून !
आपल्याला देशात पैशाची बचत आणि गुंतवणुकीचे विविध मार्ग उबलब्ध आहेत जसे बँकांतील बचत ठेवी, पोस्टातील ठेवी, शेअर्स, सोने-चांदी, रत्ने, रिअल इस्टेट इत्यादी. पण शेअर्स, घर बुकिंग करतांना आणि कंपन्यांतील मुदतीच्या ठेव योजनेत पैसे गुंतावातांना त्या कंपनीचा पूर्व इतिहास, मार्केट मधील पत, नामांकन तसेच कंपनीच्या संपूर्ण नफा-तोट्याची माहिती करूनच त्यात गुंतवणूक करावी. नाहीतर भविष्यात फसगत होण्याची शक्यता असते.
मुदत ठेव योजनेवरील व्याज सध्या वरिष्ठ नागरिक किंवा निवृत्त बँक कर्मचाऱ्यांना बँकेत अनुक्रमे ०.५० टक्के आणि एक टक्का जास्त मिळत असला तरी सध्या व्याजाचे दर दीड वर्षात १.२५ टक्क्याने कमी झाले आहेत. निवृत्ती वेतन नसणाऱ्या, व्ही.आर.एस. घेतलेल्या वरिष्ठ नागरीक असणाऱ्या देशातील नागरिकांना कमी झालेल्या व्याजाची झळ सगळ्यात जास्त बसते. आपल्याला अश्या वरिष्ठ नागरिकांसाठी सरकारने २००४ मध्ये आणलेल्या योजने बद्दल थोडक्यात समजून घेणे जरुरीचे आहे निदान काही अंशी तरी त्याचा फायदा त्यांना होईल असे वाटते.
ही योजना २००४ पासून कार्यरत आहे पण त्यावेळी व्याजाचे दर बँका, पोस्ट ऑफिस, कंपन्यांमधून आणि सरकारी दीर्घ मुदतीच्या ठेवीत व्याजाचे दर जास्त होते त्यामुळे या योजनेकडे बऱ्याच वरिष्ठ नागरिकांनी दुर्लक्ष केले. मी एकावर्षापूर्वी वरिष्ठ नागरिक झाल्याची नोंद करून सुद्धा काही बँकांतून या योजनेबद्दल सांगण्यात आले नाही किंवा तशी कल्पना दिली गेली नाही. त्यांना विचारल्यावर सांगण्यात आले की “तुम्हांला ही योजना माहित असेल असे आम्हांला वाटले” असे सोयीस्कर उत्तर देण्यात आले. पण तरीही सर्व सरकारी बँकांतील संबंधित अधिकर्यांनी वरिष्ठ नागरिकांना याची कल्पना देण्यास काहीच हरकत नाही फार तर त्यांना माहित असल्यास ते तसे सांगतील. वरिष्ठ नागरिकांना या योजनेविषयी माहिती व्हावी म्हणून हा प्रपंच!.
वरिष्ठ नागरिक बचत योजना-२००४ची ठळक वैशिष्ट : योजनेचा कालावधी ५ वर्ष असून तो पुढे तीन वर्ष वाढवू शकतो. सध्या या योजनेवर ९.३० टक्के व्याज मिळते. राक्कमेवरील व्याज दर तीन महिन्यांनी खात्यात जमा होते. व्याजावर कर भरावा लागतो. कमीत कमी रुपये एक हजार आणि त्याच्या पटीत पण पंधरा लाखापर्यंत या योजनेत गुंतवणूक करता येते. ही योजना फक्त वरिष्ठ नागरीकांकरता आहे. त्यासाठी जन्म तारखेचा दाखला प्रुफ आवश्यक आहे. त्यासाठी आयकर किंवा आधार कार्डची सत्यप्रत जोडावी. भारतीय टपाल विभागाच्या सर्व ब्रान्चेस मध्ये आणि सर्व सरकारी बँकेत ही योजना कार्यान्वित आहे. पती/पत्नी दोहे एकत्र किंवा पत्नी वरिष्ठ नागरिक असेल तर वेगवेगळे रुपये १५ लाखापर्यंत ५ वर्षांसाठी गुंतवणूक करू शकतात. इतर माहितीसाठी आपण इंटरनेटवर “वरिष्ठ नागरिक बचत योजना-२००४” असे टाकल्यास आपल्याला संपूर्ण माहिती उपलब्द होऊ शकेल. तरी वरिष्ठ नागरिकांनी या योजनेचा जास्तीजास्त लाभ घ्यावा ही विनंती.
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply