दिव्यांग
या विज्ञानाची कास धरुनी
करू अडथळे सारे पार
पुढे जाऊ सदैव पुढती
झेंडा रोवूया अटकेपार
सव्यंग असलो ,काय झाले
जगण्याचा आम्हा अधिकार
अव्यंगासम विक्रम मोडू
ही आमुची असे ललकार
कृत्रिम पाय,श्रवण यंत्र
ब्रेल लिपी असे चमत्कार
अवयव रोपण हा मंत्र
सव्यंगांसाठीच साक्षात्कार
सकारात्मक हा उर्जा वायू
सळसळतो या सर्वांगात
सहानुभूती सदैव टाळू
प्रगती करू सर्व क्षेत्रात
सौ.माणिक (रुबी)
Leave a Reply