सावल्यांचा खेळ चाले, दिवस आणि रातीला,
माणसाला संगत मिळे,
त्यांचीच हो घडीघडीला,–!!!
पहाटेच्या प्रहरी उगवे,
आवरण सारे धुक्याचे,
सोबत देत माणसा,
भोवती सारखे नाचे,–!!!
सूर्यराज उगवते,
खेळ चालू उन्हाचा,
पायात सारखे येऊ पाहे,
दूर कसा करशी मनुजा,–!!!
समय मध्यान्ह ये ,
सावली जडते पायाला,
जिथे जाई माणूस तिथे,
कवटाळी ज्याला-त्याला,–!!!
संध्याकाळ हळूच येते,
घेऊन संधिकालाला,
सावली पायाखाली जाते,
छेद देत माणसाला,–!!!
आगमन होता रजनीचे,
सुरुवात अंधार कवचाला, आपलीच सावली वाटते,
का येई अशी भेटीला,–!!!
खेळ गगनात चाले,
भोवताली सर्व चंद्र चांदण्या,
धरेवर साऱ्या वरून पडे,
भासती इथे त्यांच्या छाया,–!!!
भिंतीवर सावली पडे,
माणूस घाबरे पाहून तिला,
आत आत दडवत सारे,
का भितसे प्रतिमेला,–!!!
© हिमगौरी कर्वे
Leave a Reply