नवीन लेखन...

सावरकरांच्या कविता आणि लीलाताई जोशीबाई !!!

Sawarkar's Poems and Leelatai Joshi

जोशीबाई आम्हाला इंग्रजी खूप समरस होवून शिकवत असत. त्याच्या शिकवण्याच्या हातोटी वर आम्ही सारे खुष होतो. एकदिवशी आम्ही काही मुले जोशीबाई यांना भेटलो आणि तुम्ही आम्हाला मराठी कविता शिकवा ही विनंती त्यांना केली. जोशीबाई थोड्याश्या तापट होत्या त्यांनी मला वेळ मिळणार नाही म्हणून आम्हाला परत पाठवून दिले. आम्ही हिरमुसले झालो. काही दिवसांनी जोशीबाई स्वतःहून म्हणाल्या तुम्ही काही जण रविवारी दुपारी माझ्या कडे या. मी तुम्हाला मराठी शिकवीन. आम्हाला खूप आनंद झाला. मी आणि माझ्या बरोबर १० जण आम्ही त्यांच्या कडे मराठी कविता शिकायला गेलो. स्वातंत्रवीर सावरकरांच्या दोन कविता त्यांनी आम्हाला शिकवल्या. जवळ जवळ ६ रविवार या दोन कवितांसाठी लागले. कविता शिकवताना बाई स्वातंत्रवीर सावरकरांवर बोलत असत. बाई शिकवताना स्वतः रडत आणि आम्हालाही रडवत.

स्वातंत्रवीर सावरकरांच्या मोठ्या बंधूस गणेशपंत सावरकर यांना इंग्रज सरकारनी जन्मठेपेची शिक्षा दिली आणि त्यानंतर त्यांचे धाकटे बंधू बाळ यांनाही पोलिसांनी अटक केली .गणेशपंत सावरकरांच्या पत्नी सौ.यशोदाबाई यांनी लंडन मध्ये असलेल्या आपल्या धाकट्या दिरास पत्र पाठवून हि बातमी कळवली. वाहिनीची मनाची अवस्था स्वातंत्रवीर सावरकरांच्या लक्षात आली त्यांनी वाहिनीस एक सांत्वन करणारे पत्र लंडनहून पाठवले.ते हे पत्र……….!

जयासी तुवां प्रतीपाळले । मातेचे स्मरण होऊ न दिले ।
श्रीमती वाहिनी वत्सले । बंधू तुझा तो तुज नमीं ॥
आशीर्वाद पत्र पावलें। जे लिहिले ते ध्यानी आलें ।
मानस प्रमुदित झाले । धन्यता वाटली उदंड ॥
धन्य धन्य आपुला वंश । सु निश्चये ईश्वरी अंश ।
कि राम सेवा पुण्य लेश । आपुल्या भाग्यी लाधला॥
अनेक फुलें फुलती । फुलोनिया सुकोनी जाती ।
कोणी त्यांची महती गणती । ठेवली असें ? ॥
परी जे गजेंद्र शुन्डेने उपटीले । श्री हरी साठी मेलें ।
कमल फूल ते अमर ठेलें । मोक्ष दाते पावन ।।
त्या पुण्य गजेंद्रासमची । मुमुक्षु स्थिती भारतीची ।
करुणारवें ती याची । इंदीवरश्यामा श्रीरामा ॥
स्वोउद्यानी तिने यावे । आपल्या फुलास भुलावे ।
खुडोनिया अर्पण करावे । श्री राम चरणा ॥
धन्य धन्य आपुला वंश । सु निश्चये ईश्वरी अंश ।
कि राम सेवा पुण्य लेश । आपुल्या भाग्यी लाधला ॥
अशीच सर्व फुलें खुडावी । श्री रामचरणी अर्पण व्हावी ।
काही सार्थकता घडावी । या नश्वर देहाची ॥
अमर होय ती वंश लता । निर्वंश जिचा देवा करिता ।
दिगंती पसरे सुगंधता । लोकहित परिमलाची ।।
सुकुमार आमुच्या अनंत फुला ।गुंफोनी करहो सुमन माला ।
नवरात्रीच्या नवकाला ।मातृ भूमि वत्सले ॥
एकदा नव रात्र संपली ।नवमाला पूर्ण झाली ।
कुलदेवी प्रगटेल काली ।विजयालक्ष्मी पावन ॥
तू धैर्याची असशी मुर्ति ।माझे वाहिनी माझे स्फूर्ती ।
रामसेवा व्रताची पुर्ति ।ब्रीद तुझे आधीच ॥
महत्कार्याचे कंकण धरिले ।आता महत्तमत्व पाहिजे वाणले ।
ऐसें वर्तन पाहिजे केलें ।कि जे पसंत पडले संतांना ॥
अनेक पूर्वज ऋषीश्वर ।अजात वंशाजाचे संभार ।
साधु साधु गर्जतील ।ऐसें वर्तणे ह्या काला ॥

या पत्रात स्वातंत्रवीर सावरकर वाहिनीला सांगतात कि अशीच सर्व फुलें खुडावी आणि श्री रामाच्या चरणी (या देशासाठी ) अर्पण व्हावी. इतकी प्रचंड देशभक्ती असलेल्या सावरकरांवर मात्र स्वराज्य मिळाल्यानंतर कोणता सन्मान प्राप्त झाला?

चिंतामणी कारखानीस —

चिंतामणी कारखानीस
About चिंतामणी कारखानीस 75 Articles
चिंतामणी कारखानीस हे ग्राहक संरक्षण सेवा समिती या संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष होते. त्यांना या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल २०१० चा Consumer Awareness Award हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे ते माजी अध्यक्ष आहेत. विविध वृत्तपत्रांत व मासिकांत त्यांचे लेख प्रकाशित झाले असून आकाशवाणीवर भाषणेही प्रसारित झाली आहेत. ते शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रवक्ते आहेत.

1 Comment on सावरकरांच्या कविता आणि लीलाताई जोशीबाई !!!

  1. नमस्कार.
    सावरकारांचें वहिनीला लिहिलेलें पत्र वाचलें. आतां, सध्याचें सरकार आल्यावर, कांहींतरी सावरकरांबद्दल होत आहे. मागेही BJP चें सरकार असतांना सावरकरांचा फोटो पार्लमेंटमध्ये लावला गेला. नाहींतर, अन्य सरकारें ! मणीशंकर ऐय्यर यांनी तर अंदमानमधील सावरकांचें काव्यही हटवलें होतें.
    पण, ‘वंदा वा निंदा’, सावरकार या सर्वाच्या पल्याड होते. उगाच नाही त्यांनी म्हटलेलें आहे : ‘की घेतलेंद व्रत न हें अम्हि अंधतेंनें । ………. बुध्याच वाण धरिलें करिं हें सतीचें ।’ .
    सवातत्र्यवीरांची स्मृति जागवणें व त्यांना वंदन करणें , हें तर तुम्ही-आम्ही आपण नक्कीच करूं शकतो.
    सधन्यवाद व स्नेहादरपूर्वक,
    सुभाष नाईक

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..