नवीन लेखन...

पटकथा लेखक सचिन भौमिक

१९५८ साली नर्गिस यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘लाजवंती’ या चित्रपटापासून सचिन भौमिक यांनी पटकथा लेखनाला सुरुवात केली. त्यांचा जन्म १७ जुलै १९३० रोजी झाला. त्यानंतर १९६० साली बलराज साहनी व लीला नायडू यांच्या अभिनयाने गाजलेल्या ‘अनुराधा’ चित्रपटाला त्यावर्षीचा उत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने भौमिक कथा-पटकथा लेखक म्हणून प्रस्थापित झाले. ‘आई मिलन की बेला’, ‘जानवर’, ‘लव्ह इन टोकियो’, ‘गोलमाल’, ‘हम किसीसे कम नहीं’ यांसारख्या चित्रपटांपासून ते थेट अलीकडच्या ‘क्रिश’, ‘किसना’, ‘कोई मिल गया’ यांसारख्या ७० हून अधिक चित्रपटांचे पटकथा लेखन करणारे सचिन भौमिक यांनी नासिर हुसैन, हृषिकेश मुखर्जी, सुभाष घई, प्रमोद चक्रवर्ती, जे ओमप्रकाश, राकेश रोशन यांसारख्या दिग्दर्शकांसोबत काम केले होते. त्यानंतर १९६८ साली प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मचारी’ या शम्मी कपूर-राजश्री अभिनीत चित्रपटासाठी त्यांना पटकथा लेखनाचा पुरस्कार मिळाला होता. भौमिक यांचे अनेक चित्रपट यशस्वी झाले. सचिन भौमिक यांचे १२ एप्रिल २०११ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

ninad@cybershoppee.com
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..