नवीन लेखन...

महादेवाच्या पिंडीचे रहस्य

Secrets about Shiv Pooja

भगवान महादेवाच्या पूजेबद्दल काही महत्त्वाची माहिती……..

● घरात देवघरात महादेवांची पींड ठेवावी मुर्ती/ फोटो नाही.

● घरात देवघरातील पींडीवर नाग नसावा तथा नंदीही नसावा.

● पींड साधी दगडी असली तरी चालते मात्र शक्यतो पितळेची असावी.

● देवघरातील पींड 3 इंचा पेक्षा मोठी असु नये ती 3 इंच पेक्षा छोटी असावी.

● भगवान महादेव हे देवाधिदेव असुन हे न्यायप्रिय दैवत आहेत आणि यांचे सर्व प्रकारचे भक्त आहेत, आणि जसे देव, दानव, यक्ष, किन्नर, भूतं, प्रेतं, पिशाच्चं, आणि इतरही अनेक योनी जीव महादेवास भजतात. आणि जिथे महादेवांची मुर्ती/फोटो असतो तिथे त्यांचे सर्व भक्त उपस्थित होतात.

● जोतिर्लिंगाच्या ठिकाणी तथा महादेवांच्या पींडीला संपूर्ण गोल प्रदक्षिणा करीत नाहीत, तर अर्धी प्रदक्षिणा करुन नमस्कार करतात कारण उत्तर दिशेला वरील सर्व भक्तांचा अदृश्य रुपाने उपस्थित असतात. तथा उत्तर दिशेने महादेवांच्या पींडीवर जलाअभिषेक घातलेले पाणी तीर्थ रुपाने वाहत असते ते ओलांडून गेल्याचे पातक लागते.

● महादेवांचा फोटो अथवा मुर्ती फक्त स्मशानात असते, देवघरात महादेवांचा फोटो अथवा मुर्ती नसावी. मानवाला पींड पूजन सांगीतले आहे म्हणूनच संपूर्ण भारतात महादेवांचे मुख्य शक्ति पीठांवर महादेवांची पींड लिंग रुपाने स्थापन केलेले समजते.

● 12 ज्योतिर्लिंग ही लिंग म्हणजेच पींड रुपाने आहेत, यातुन संपूर्ण विश्वाला वैश्विक ऊर्जा मिळते .

● महादेवांना नित्य शुद्ध पाण्यासह रुद्रसुक्त पठण करीत जलाभिषेक करावा.

● महादेवांना जल अति प्रिय आहे, एखाद्याने महादेवांस जल अर्पण केल्यास ते त्यावर खुप प्रसन्न होतात.

● महादेवांना मनापासून मोठ्या संख्येने एकत्र येऊन सामुदायिक जलरुद्राभिषेक केल्यास विपूल पर्जन्यमान राहते.

● गुरुचरित्रात असे म्हटले आहे की, नित्यच्या रुद्राभिषेकाने दीर्घायुष्य, आरोग्य मिळते आणि अकाली मृत्यू टळतो.

● श्रीमद्भागवतात म्हटले आहे की, महादेवांची नित्य नियमित रुद्राभिषेकाने सेवा केल्यास घरी अखंड लक्ष्मी वास करते आणि त्या भक्तांच्या घरी अखंड श्रिया राहते आणि सर्व सुख समृद्धी वाढून सर्वत्र कीर्ती पसरते.
हर हर महादेव या सात वस्तू भगवान शंकरांना कधीही अर्पण करू नका….! का तर जाणुन घ्या.

भगवान शंकरांविषयी थोडी काळजी बाळगण्याची गरज असते. उत्साहाच्या भरात काही चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडत तर नाहीत ना, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

खाली दिलेल्या या गोष्टी भगवान शंकरांना कधीही अर्पण करु नका…

१. शंख – शिवपुराणानुसार भगवान शंकरांनी शंखचूड नावाच्या असूराचा वध केला होता. तो भगवान विष्णूचा भक्त असल्याने त्यांची आणि लक्ष्मीची शंखाने पूजा केली जाते.

२. हळद कुंकू- भगवान शंकर आजन्म वैरागी होते. त्यामुळे शृंगाराशी संबंधी कोणतीही वस्तू त्यांना अर्पण केली जात नाही. हळदीलाही सौंदर्यवर्धक मानले जाते. त्यामुळेच हळद किंवा कुंकु भगवान शंकरांना अर्पण केले जात नाही. या गोष्टी भगवान विष्णूंना अर्पण केल्या जातात.

३. तुळशी पत्र – असूरांचा राजा जलंधर याच्याविषयी असलेल्या एका कथेनुसार त्याची पत्नी वृंदा तुळशीचे रोपटे बनून गेली होती. भगवान शंकरांनी जलंधराचा वध केला होता. त्यामुळे भगवान शंकरांच्या पूजेत तुळशीपत्र न वापरण्याचा पण वृंदाने केला होता.

४. नारळ पाणी – नारळाच्या पाण्याचा भगवान शंकरांवर अभिषेक केला जात नाही. नारळाला लक्ष्मीचे रुप मानले जाते. म्हणून शुभकार्यात नारळाचा वापर करुन त्याचा प्रसाद म्हणून वापर केला जातो. पण, भगवा शंकरांना अर्पण केलेले पाणी निर्माल्य होते.

५. उकळलेले दूध – उकळलेले दूध किंवा बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूध कधीही भगवान शंकरांना अर्पण करू नये. त्यापेक्षा गंगाजलाने अभिषेक करा. बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूधही उकळलेले असते. त्यामुळेच त्याचा वापर करणेही टाळावे.

६. केवड्याचे फूल – भगवान शिवांच्या पूजेत केवड्याचे फूल वर्जित आहे. शिव पुराणानुसार ब्रह्मदेव आणि विष्णूच्या वादात खोटे बोलल्यामुळे केवड्याला भगवान शंकरांनी शाप दिला होता.

७. कुंकू किेंवा शेंदूर – कुंकू किंवा शेंदूराचा वापरही भगवान शंकरांची पूजा करण्यात वर्ज्य केला आहे..

!!ॐ नमः शिवाय !!

Avatar
About वसंत चरमळ 52 Articles
श्री वसंत चरमळ हे जय श्रीराम साखर कारखाना येथे व्यवस्थापक असून विविध विषयांवर नियमितपणे लेखन करतात.

7 Comments on महादेवाच्या पिंडीचे रहस्य

  1. महादेवाच्या काही पिंडी दोन लिंगी का असतात?

  2. रुईची पाने अर्पण केली तर चालतात का?

  3. ०४.१२.१६
    नमस्कार.
    भाविकांसाठी उपयुक्त माहिती देणारा तुमचा लेख आहे.
    – शंकराबद्दल आणखी कांहीं माहिती –
    – हा देव मूळचा अनार्यांचा देव आहे. पुढे आर्यांनी त्याचा स्वीकार केला. आर्यांच्या साहित्यात रुद्र याचा उल्लेख मिळतो. पुढे, रुद्र व शिव यांचें एकाम्य झालें. ( अर्थात्, ‘आार्य’ या नांवाची कोणी जनजाति – clan – नव्हती. पण इथें मी, समजायला सोप्या, म्हणून त्या कल्पनेचा वापर केला आहे).
    – शिव हा अनार्यांचा देव होता, म्हणूनच तो वारंवार असुरांना प्रसन्न होत असे.
    – समुद्रमंथनाची जी आख्यायिका आहे, त्या मंथनाच्या वेळीही शिवानें देव किंवा असुर कोणाचीही बाजू घेतली नाहीं ; तर त्यानें उत्पन्न झालेलें हलाहल मात्र प्राशन केलें .
    – प्रागैतिहासिक काळात Phallus पूजनाची प्रथा होती, त्यावरून शिवलिंगाची कल्पना विकसित झाली, असें मानतात.
    – तुम्ही दिलेली सर्व माहिती, ही पुराणांच्या काळारील व / अथवा मध्य-युगातील असावी, असें वाटतें.
    – मात्र सिंधु-सरस्वती संस्कृतीच्या seal वर पशुपतिचें चित्र आहे (पशुपति म्हणजे शिवच) , त्यावरून, शिव-पूजा या ना त्या रूपानें फार आधीपासून प्रचलित होती, हें उघड आहे.
    सस्नेह,
    सुभाष नाईक.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..