जे जे मजला हवेच होते,
मिळवित गेलो यत्न करूनी,
चालत असता जेव्हा पडलो,
उठलो होतो धीर धरूनी ।।१।।
आतंरिक ती शक्ती माझी,
पुन्हा पुन्हा तो मार्ग दाखवी,
शरिराला ती जोम देवूनी,
वाटेवरती चालत ठेवी ।।२।।
निराश मन हे कंपीत राही,
विश्वालासा तडे देवूनी,
दु:ख भावना उचंबळता,
देह जाई तेथे हादरूनी ।।३।।
परि विवेक हा जागृत होता,
विश्लेषण जो करित राही,
सुख, दु:खाचा अर्थ लावूनी,
मनास तेव्हा धीरच देई ।।४।।
गिळून घेता अपयश सारे,
खंत वाटली कधी न त्याची,
समज आली मनास ही की,
चूक असावी मार्ग निवडीची ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply