कुस्तीवीर, ज्येष्ठ अभिनेते दारासिंग यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९२८ रोजी झाला.
रुबाबदार शरीरयष्टी असलेल्या दारा सिंग यांनी १९६२ मध्ये बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. अनेक दिग्दर्शकांनी त्यांची बलदंड शरीरयष्टी पाहून त्यांच्या व्यक्तीमत्वाला साजेशा भूमिका दिल्या होत्या.
१०० हून अधिक चित्रपटांत दारा सिंग यांनी अभिनय केला होता. १९७८ साली दारासिंग यांना रुस्तम-ए-हिंद या किताबाने गौरवण्यात आले होते. २००३ साली ते राज्यसभेचे खासदारही झाले.
दूरचित्रवाणीवरील गाजलेल्या रामायण मालिकेतील दारा सिंग यांची हनुमानाची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली. ‘जब वुई मेट’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. ‘कल हो ना हो’ या चित्रपटातही त्यांनी अभिनय केला होता. अनेक हिंदी, पंजाबी चित्रपटात त्यांनी काम केले होते.
दारा सिंग यांचे १२ जुलै २०१२ रोजी निधन झाले. आपल्या समूहातर्फे दारा सिंग यांना आदरांजली.
– संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply