नवीन लेखन...

ज्येष्ठ अभिनेते डेव्हिड

डेव्हिड यांचा जन्म २४ जून १९०९ रोजी ठाणे येथे झाला.

डेव्हिड हे एक बेने इस्रायली ज्यू होते हे अनेकांना माहीत नसावे. त्यांचे पूर्ण नाव डेव्हिड अब्राहम चेऊलकर! चार दशके हिंदी चित्रपटसृष्टीत एक उत्तम चरित्र अभिनेते अशी ओळख असणारे डेव्हिड यांनी मुंबई विद्यापीठातून १९३० साली बी.ए झाल्यावर डेव्हिड यांनी पुढची सहा वर्षे नोकरी मिळवण्यासाठी धडपड केली. नोकरी मिळाली नाही, पण या काळात त्यांनी वकिलीची परीक्षा दिली. मुंबईच्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना सिनेमा स्टुडिओमध्ये किरकोळ काम करणाऱ्या नायमपल्ली यांच्याशी डेव्हिड यांची मत्री जमली. त्याच्या ओळखीमुळे १९३७ साली डेव्हिडना ‘जम्बो’ या चित्रपटात काही किरकोळ भूमिका मिळाली.

१९४१ साली प्रदर्शित झालेला ‘नया संसार’ हा खऱ्या अर्थाने त्यांचा पहिला चित्रपट. डेव्हिड यांनी एकूण एकशे दहा चित्रपटांत भूमिका केल्या. त्या बहुतेक चरित्र अभिनेत्याच्या. बूटपॉलिश (१९५४), चुपके चुपके (१९७५), सत्यम् शिवम् सुंदरम् (१९७८), गोलमाल (१९७९), बातों बातों में (१९७९), खूबसूरत (१९८०) या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका अविस्मरणीय झाल्या.

‘इप्टा’ (इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन) या नाटय़- सांस्कृतिक संस्थेशी निगडित असलेल्या डेव्हिड यांनी के. ए. अब्बास यांच्या ‘शहर और सपना’, ‘चार दिल चार राहें’ आदी चित्रपटांतूनही कामे केली.

१९५९ ते १९७५ या काळात उत्तम सूत्रसंचालक म्हणून त्यांची प्रसिद्धी झाली. अनेक महत्त्वाच्या पुरस्कार वितरण, प्रकाशन, उद्घाटनाच्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन त्यांनी केले.

डेव्हिड क्रीडाप्रेमी होते, त्यामुळे ऑलिम्पिक खेळाडूंसह भारतीय समूहात त्यांचीही निवड एकदा झाली होती.

त्यांच्या अभिनयगुणांसाठी भारत सरकारने १९६९ साली ‘पद्मश्री’ने त्यांचा बहुमान केला.

डेव्हिड यांचे टोरांटो येथे २८ डिसेंबर १९८१ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..