ज्येष्ठ अभिनेते मोहन चोटी यांचा जन्म १९३९ साली झाला.
मोहन चोटी हे हिंदी चित्रपटसृष्टीमधील प्रख्यात कॉमेडीयन होते. मोहन आत्माराम देशमुख हे मोहन चोटी यांचे खरे व पूर्ण नाव.
‘ब्लफ मास्टर’ चित्रपटामध्ये ‘मोहन चोटी’ या व्यक्तिरेखेचे नाव त्यांनी आपलेसे केले. राजस्थानमधून मुंबईत आल्यानंतर त्यांना बराच ‘स्ट्रगल’ करावा लागला. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी ‘एक्स्ट्रा’ म्हणून काम केले. त्यासाठी अनेक स्टुडिओजचेही उंबरठे झिजवले.
१९५४ साली त्यांनी बॉलीवूड मध्ये प्रवेश केला. तब्बल २५० चित्रपटांमधून त्यांनी काम केले. ‘चलती का नाम गाडी’, ‘थानेदार’, ‘मुकद्दर का बादशहा’, ‘नसीब’, ‘फलक’, ‘दादागिरी’, ‘नाचे मयुरी’,’भूत बंगला’, ‘व्हिक्टोरिया नं. २०३’, ‘दिल भी तेरा हम भी तेरे’, ‘फर्ज’… आदी त्यांचे उल्लेखनीय चित्रपट.
‘धोती लोटा और चपाती’ तसेच ‘हंटरवाली ७७’ या दोन चित्रपटांची निर्मिती तसेच दिग्दर्शन त्यांनी केले होते.
चोटी यांनी ‘ते माझे घर’, ‘चिमुकला पाहुणा’, ‘अजब तुझे सरकार’, ‘नवरा बायको’, ‘येडा की खुळा’, ‘उपकार दुधाचे’ या मराठी चित्रपटांमध्येही काम केले होते.
मोहन चोटी यांचे निधन १ फेब्रुवारी १९९२ रोजी झाले.
https://www.youtube.com/watch?v=G8_TBcrgAwk
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply