ज्येष्ठ अभिनेत्री लता शिलेदार उर्फ दीप्ती भोगले यांचा जन्म २६ ऑक्टोबर १९५० रोजी झाला.
जयराम व जयमाला शिलेदार यांच्या कन्या दीप्ती भोगले. त्या पुणे विद्यापिठाच्या मराठी विषयातील एम.ए.पदवीधारक आहेत. संगीत रंगभूमीवर नायकाच्या भूमिका गाजवणाऱ्या मोजक्या अभिनेत्री मध्ये दीप्ती भोगले यांचे नाव वरती आहे. त्यांच्या कृष्ण, धेर्यधर या भूमिका खूपच गाजल्या होत्या. दीप्ती भोगले यांनी संगीत रंगभूमीवर स्त्री भूमिके पासून पुरुष भूमिके पर्यत आपले स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले. वयाच्या ६ व्या वर्षी त्यांनी रंगभूमीवर पाऊल टाकले. त्या संगीत रंगभूमीवर साठ हून अधिक वर्ष कार्यरथ आहेत. जेष्ठ अभिनेते किरण भोगले हे त्यांचे पती. गेले अनेक वर्षे महाराष्ट्राचे संस्कृतीक वैभव संगीत नाटक हे युवा पिढी पर्यंत पोहोचण्याचे कार्य दीप्ती भोगले व कीर्ती शिलेदार करत आहेत. त्यांना नाट्य परिषदेतर्फे ‘चांदोरकर, मामा वरेरकर’, ‘रामकृष्णबुवा वझे, दीनानाथ मंगेशकर, बालगंधर्व, माणीक वर्मा असे पुरस्कार मिळाले आहेत.
जयराम शिलेदार यांनी ‘मराठी रंगभूमी, पुणे’ ही नाट्य संस्था १ ऑक्टोबर १९४९ रोजी स्थापन केली. त्या माध्यमातून पंचेचाळीसहून अधिक संगीत नाटकांचे प्रयोग केले. संगीत रंगभूमीच्या पडत्या काळात तिला सावरून धरण्याचे काम याच संस्थेने केले. तसेच गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्यसेवा ट्रस्ट हा १९९३ साली स्थापन झालेला ट्रस्ट असून, या दोन्ही संस्था कीर्ती शिलेदार आणि दीप्ती भोगले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे.
नुकताच ‘स्वरसम्राज्ञी’ कीर्ती शिलेदार यांची गायिका व अभिनेत्री अशी संगीत रंगभूमीवरील वाटचाल आणि त्यांचा स्वरप्रवास आधुनिक माध्यमाद्वारे रसिकांसमोर ‘मम सुखाची ठेव’ दीप्ती भोगले यांनी चित्रफितीच्या द्वारे आणला आहे.
दीप्ती भोगले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
त्यांची गाजलेली काही नाटके.
शारदा,संशयकल्लोळ,मानपमान,भावबंधन,ययाती देवयानी, स्वरसम्राद्नी.
https://www.youtube.com/watch?v=hj42cY8e76Q
https://www.youtube.com/channel/UC4fnxYyJRyd77KmwB_mrbMw
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply