ज्येष्ठ लेखक डॉ. प्रभाकर माचवे यांचा जन्म २६ डिसेंबर १९१७ रोजी ग्वाल्हेर मध्य प्रदेश येथे झाला.
प्रभाकर माचवे यांनी आपल्या आयुष्याची पन्नास वर्षे त्यांनी हिंदी, मराठी आणि इंग्रजी लेखनासाठी वाहिली. त्यांनी आपल्या लेखन प्रवासाची सुरुवात विद्यार्थी जीवनातूनच केली होती. त्यांनी आपले शिक्षण उज्जैनच्या विक्रम विद्यापीठातून केले. लिखाणाबरोबरच त्यांनी पदव्युत्तर अभ्यासही सुरू ठेवला. इंग्रजी साहित्य, साहित्य रत्न आणि पीएचडी केली होती.
कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात डॉ.माचवे यांनी १९४८ ते ५४ या काळात ऑल इंडिया रेडिओ, अलाहाबाद आणि नागपूर येथे काम केले. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांनी १९५४ मध्ये साहित्य अकादमी स्थापन करण्यासाठी त्यांना आमंत्रित केले होते. त्यांचे अफाट ज्ञान, साहित्यिक कौशल्य आणि अभ्यासू नेतृत्व साहित्य अकादमीला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्व व अभिमानाने घेऊन गेले. त्यांनी संस्थेच्या विकासास हातभार लावला.
डॉ. प्रभाकर माचवे हे एक उत्तम लेखक होते, त्यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये १०० हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या लेखनात भाषांतर, कादंबऱ्या, काव्य, लघुकथा, चरित्रे, मुलांची पुस्तके, प्रवासी प्रवास, व्यंगचित्र, टीका, संपादित खंड, समीक्षा व इतर विविध विषयांचा संग्रह यांचा समावेश होता.
डॉ. प्रभाकर माचवे यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. अमेरिकेतील अनेक विद्यापीठांत त्यांनी भारतीय साहित्य, धर्म आणि संस्कृती, तत्वज्ञान, गांधीवाद शिकवले. त्यांना जर्मनी, रशिया, श्रीलंका, मॉरिशस, जपान आणि थायलंड इत्यादी देशांच्या व्याख्यानमालेसाठी आमंत्रित केले गेले होते.
१९७५ मध्ये साहित्य अकादमीमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी १९७६ ७७ च्या दरम्यान सिमला येथील इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडीजमध्ये दोन वर्षे काम केले. त्यानंतर ते कोलकाता १९७९ ते १९८५ च्या दरम्यानभारतीय भाषेच्या परिषदेचे संचालक म्हणून रुजू झाले. १९८८ ते १९९१ मध्ये त्यांनी इंदौर मध्ये ‘चौथा संसार’ या हिंदी दैनिकात मुख्य संपादक म्हणून काही वर्षे काम केले.
त्याच्या बद्दल खूप कमी लोकांना माहिती म्हणजे ते उत्तम चित्रकार होते. ते इंदूरच्या जेजे स्कूलमध्ये चित्रकला शिकले होते. ते एम.एफ. हुसेन आणि बेंद्रे हे समकालीन निपुण चित्रकार होते. त्याचे काही स्केचेस आपल्याला ‘शब्द’ या पुस्तकात बघायला मिळतात.
प्रभाकर माचवे यांचे १७ जून १९९१ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply