भाजपचे ज्येष्ठ नेते व मंत्री नितीन गडकरी यांचा जन्म २७ मे १९५७ रोजी नागपूर येथे झाला.
१९७६ मध्ये नितीन गडकरी यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (अभाविप) कार्यकर्ता म्हणून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली. वयाच्या २३व्या वर्षी ते भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) चे अध्यक्ष झाले. १९८९ मध्ये ते महाराष्ट्र विधान परिषदेवर प्रथम निवडून गेले.२० वर्षे ते विधान परिषदेचे सदस्य होते. महाराष्ट्रात सन १९९५-१९९९ या काळात भा.ज.प.-शिवसेना युतीचे सरकार सत्तेत असताना ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह अनेक नवीन रस्ते व किमान ५५ उड्डाणपूल बांधले गेले. त्यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. २००९ साली त्यांची भारतीय जनता पक्षाचे ९ वे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडले गेलेले ते दुसरे मराठी नेते ठरले. कुशाभाऊ ठाकरे हे पक्षाचे पहिले मराठी राष्ट्रीय अध्यक्ष होते. वयाच्या केवळ बावन्नव्या वर्षी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झालेले नितीन गडकरी हे पक्षाचे सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष होते. नितीन गडकरी हे सध्या मोदी सरकार मध्ये भूपृष्ठ वाहतूक व जहाज मंत्री आहेत.
महाराष्ट्रातील कोरोनाच्या मुख्य हॉटस्पॉटपैकी एक असलेल्या नागपुरातील परिस्थिती नियंत्रणात आणणारे नितीन गडकरी (Nitin Gadkari) सध्या चांगलेच चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते नागपुरात ठाण मांडून बसले होते. गडकरी बसल्या जागेवरून योग्यपणे सूत्रे हाताळत नागपूर आणि विदर्भासाठी ऑक्सिजन, रेमडेसिव्हिर इंजेक्शन्स आणि वैद्यकीय सुविधा यापैकी कशाचीही कमी भासणार नाही, याची काळजी घेत होते. त्यामुळेच नागपुरातील परिस्थिती आता आटोक्यात आली आहे. अर्थात नितीन गडकरी यांनी धडाडीने आणि अचूक नियोजन करून काम करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.
नितीन गडकरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply