नवीन लेखन...

ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर

मंगेश तेंडुलकर यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९३६ रोजी पुणे येथे झाला.

उंचापुरा बांधा, पांढरी शुभ्र दाढी, जणू पायाला भिंगरी लागली असावी अशा तऱ्हेने मोटारसायकलवर फिरणारे असं रूप असलेले तेंडुलकर पुण्यात अनेक सार्वजनिक कामात हटकून दिसायचे. टोकदार रेषांचे धनी आणि परखड भाष्य करणारे मंगेश तेंडुलकर हे राजकीय व्यंगचित्रकार होते. व्यंगचित्रांसोबतच ते लेखणही करत होते. अनेक नियतकालिकात त्यांचे लेखही प्रसिद्ध झाले आहेत.

शालेय शिक्षण भावे हायस्कूलमध्ये व स. प. महाविद्यालयातून बी.एस्सी. पदवी संपादन केल्यानंतर मंगेश तेंडुलकर यांनी सुरुवातीला काही काळ पुण्यातील ॲ‍पम्युनिशन फॅक्टरीत काम केले. मात्र, व्यंगचित्र रेखाटनाचा छंद जोपासण्यासाठीही त्यांनी आपला वेळ दिला.

वैद्यकीय उपचारांसाठी तसेच रुग्णालयांसाठी लागणारी वैद्यकीय उपकरणे बनविणे हा त्यांचा मूळ व्यवसाय होता. मंगेश तेंडुलकरांचे वाचनही अफाट होते. मंगेश तेंडुलकरांनी स्वतःची शैली निर्माण केली होती. काही ठिकाणी त्यांनी रंग-रेषातून परखड भाष्य केलेले होते. त्यांचे स्ट्रोक्स हे अतिशय दमदार होते.त्यांच्या प्रत्येक स्ट्रोक्सने अनेकांना घायाळही केले होते. वयाच्या अखेरच्या टप्प्यात त्यांनी कॅरिकेचर्सही शिकले. त्यामुळे शेवटपर्यंत नवे काही शिकण्याची उर्मी त्यांच्यात दिसली होती.

त्यांचे ‘संडे मुड’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे. पुण्यातील सामाजिक-सांस्कृतिक अशा अनेक सार्वजनिक कार्यक्रमात तेंडुलकरांची उपस्थिती कायम राहात होती. पुण्यातील ट्रॅफिक समस्येवर रस्त्यावर उतरून त्याबद्दल जागृती करण्याचे काम तेंडुलकर गेली १७ वर्षे करत होते. मुलांसाठी सांता बनुन त्यांना भेट वस्तू देण्यासाठीही ते एका शाळेत गेले होते. व्यंगचित्र काढण्यासाठी आचार्य अत्रेंची वाचलेली पुस्तके फार उपयोगी पडली असे व पु.ल.देशपांडेंच्या पुस्तकांमुळे वृत्तपत्रांसाठी कशी व्यंगचित्रे पाहिजे हे कळाल्याचे तेंडुलकरांनी एका मुलाखतीत सांगितले होते. बा.भ.बोरकरांच्या कवितांमुळे वाचनाची आवड निर्माण झाल्याचे तेंडुलकर नेहमी म्हणत.

भाऊ विजय तेंडुलकरांमुळे इंग्रजी पुस्तके त्यांना वाचायला मिळाल्याचे एका मुलाखतीत तेंडुलकरांनी सांगितले होते. आपल्या आवडत्या व्यक्तीला व्यंगचित्रातून श्रद्धांजली वाहण्याचे धाडसही तेंडुलकरांनी दाखवले होते.

मंगेश तेंडुलकर हे अखेरपर्यंत कार्यरत असणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते. मंगेश तेंडुलकर यांनी ९० हून अधिक व्यंगचित्र प्रदर्शन आयोजीत केली होती. स्वतःचा मृत्यू या विषयावरही त्यांनी व्यंगचित्रांची मालिका बनवली होती.

मंगेश तेंडुलकर यांचे १० जुलै २०१७ रोजी निधन झाले.

मंगेश तेंडुलकर यांचे लेखन.

संडे मूड, भुईचक्र, अतिक्रमण, कुणी पंपतो अजून काळोख, ‘बित्तेशां?’‘दांकेशां!’

मंगेश तेंडुलकरांचे व्यंगचित्रांबद्दलचे लेख.

बिचाऱ्या अफझलचे महाराजांस पत्र (जत्रा, १९८९), आमच्या पुण्यातील नाट्यगृहे (जत्रा, १९९८) गुप्ताजींचे सोपे तंत्र (लोकप्रभा, १९९८), चौकटीतल्या आत्म्याला (आवाज, दिवाळी अंक २००३), व्यंगचित्रांतून संवाद साधताना (छात्र प्रबोधन, दिवळी अंक २००३), मोबाईल फ्री (श्री दीपलक्ष्मी, दिवळी अंक २००३), माझ्या गोव्याच्या भूमीत! (गोमांतक, दिवळी अंक २००३), व्यंगचित्र हेच पहिलं प्रेम (ग्राहकहीत, दिवळी अंक २००३), व्यंगचित्रांची भाषा (कुटुंब…च कौटुंबिक, दिवळी अंक २००३), व्यंगचित्रे ही कला नाहीच. (किस्त्रिम, दिवळी अंक २००३)

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..