नवीन लेखन...

ज्येष्ठ बल्लवाचार्य विष्णू मनोहर

ज्येष्ठ बल्लवाचार्य विष्णू मनोहर यांचा जन्म १८ फेबुवारी १९६८ रोजी झाला.

खाद्यक्षेत्रात मुशाफिरी करत महाराष्ट्रातील पारंपरिक पाककृतींना जागतिक व्यासपीठ मिळवून देणारे ज्येष्ठ बल्लवाचार्य विष्णू मनोहर हे नाव आज घराघरांत सर्वपरिचित आहे. आपल्या हातच्या चवीने सगळ्यांची मनं तृप्त करत स्वयंपाकाला ग्लॅमर मिळवून देणारे विष्णू मनोहर हे एक भारतीय बल्लवाचार्य अर्थात शेफ, उद्योजक, पाककलेवर आधारित पुस्तके लिहिणारे लेखक, दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांचे सूत्रसंचालक, तसेच निर्माते रेस्टॉरंटर आहेत. ते सध्या Manover हॉस्पिटॅलिटी पीव्हीटी.लिमिटेड येथे कार्यकारी शेफ म्हणून काम करीत आहेत.

ते ललित कला शाखेचे पदवीधर असून उद्योजकसुद्धा आहेत. एक प्रशिक्षित व्यावसायिक कलाकार असणाऱ्या विष्णू यांनी ललितकलेचे क्षेत्र सोडले असून पाककलेचे क्षेत्र निवडले. कारण त्यांना बहुधा हे माहित होते की – माणसाच्या हृदयाचा मार्ग हा त्याच्या पोटातून जातो.

त्यांनी परदेशातसुद्धा खाद्यक्षेत्रासंबंधी काम केले आहे.१९८८ पासून मनोहर ग्रुपसोबत कार्य करतच पुढे ते २०१० मध्ये कार्यकारी शेफ तसेच दिग्दर्शक म्हणून हॉस्पिटॅलिटी पीव्हीटी लिमिटेड मध्ये रुजू झाले. त्यांनी पाककलेसंबंधी ५० हून अधिक पुस्तके लिहिली आहेत.

विष्णुजी हे प्रसिद्ध व लोकप्रिय बल्लवाचार्य अनेक पाककलास्पर्धांचा हिस्सा आहेत. त्यांनी ई टीव्ही मराठी व कलर्स मराठी या वाहिन्यांवरील ‘मेजवानी परिपूर्ण या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून काम केले होते. त्यांनी झी २४ तास, सामना, लोकमत सखी मंच आणि रामबंधू मसाले आणि साम टीव्ही, दावत-ई-खाला या वाहिन्यासाठी पाककला स्पर्धांचे कार्यक्रम केले आहे. विष्णू मनोहर यांनी भारत व परदेशात (भूतान, दुबई, सिंगापूर,नेपाळ) ४५०० हून अधिक कार्यक्रम केले आहेत. याद्वारे त्यांनी ४ लाखांहून अधिक महिलांना प्रशिक्षित केले आहे.

विष्णू यांनी सुपरमार्केट व विमान संस्थाना मार्गदर्शन केले आहे. त्यांनी भारतीय अन्न महामंडळाचे (फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) सदस्य म्हणून कामले आहेत. त्यांनी पाककलेवर आधारित ३६ पुस्तके व उपहारगृह चालवण्यामागील तंत्र यावर लेखन केले आहे. भारत आणि संयुक्त अरब अमिराती या देशांत त्यांची मूलभूत भारतीय आमटीवर आधारित CD आणि ध्वनिचित्रफीत प्रकाशित करण्यात आली आहे. यास प्रसिद्ध परिचयात्मक अमीन सयानी यांचा आवाज असून तीत उत्तमोत्तम पाककृती आहेत. त्यांचे मूलभूत भारतीय आमटीवर आधारित पुस्तक प्रकाशित होणार आहे.

त्यांनी रेडीओ मिरचीवरील सीधे तवा से या कार्यक्रमाचे,तसेच विविधभारतीवरील चूल्हा चौका या कार्यक्रमाचे सुद्धा संचालन केले.

नुकतेच मार्च २०२१ मध्ये शेफ विष्णू मनोहर यांनी पुण्यात ७ तासात ७ हजार किलो मिसळ शिजवण्याचा आणि ३ तासात ३००० सामाजिक संस्थांमार्फत ३० हजार गोरगरिब, गरजू लोकांपर्यंत ही मिसळ पोहोचवण्याचा विश्वविक्रम केला गेला आहे.

शेफ विष्णू मनोहर यांनी याआधी देशभरात अनेक रेकॉर्ड तयार करण्यात आले आहे. सर्वात मोठं पराठा, ५००० किलोची खिचडी, कबाब असे विक्रम केले आहेत. तसेच विष्णू यांनी अविरत ५३ तास स्वयंपाक करण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.

त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण पार्श्वभूमी असणारी ”विष्णुजी की रसोई” ही उपहारगृहांची शृंखला स्थापन केली आहे. या उपहारगृहात विदेशी मात्र अस्सल अन्न, पंजाबी व महाराष्ट्रीयन (मराठी) खाद्यपदार्थ केले जातात. त्यांच्या उपहारगृहाच्या शाखा नागपूर, पुणे, औरंगाबाद, इंदूर, ठाणे, मुंबई आणि कल्याण या शहरांत आहेत. तसेच अमेरिकेत मध्येही या उपहारगृहाच्या शाखेचा आरंभ झाला आहे. ते स्वतःची आवड जोपासणारे,मनोरंजक तसेच प्रेरणादायक वक्ते आहेत. त्यांनी १०१ अंडेका फंडा, खाऊचा डबा, बिर्याणी आणि पुलाव, बेकरी बेकरी, भारतीय ‘करी’चे रहस्य

रसोई गोडोबा पक्वान्न विशेष, रसोई – पौष्टिक आणि चटपटीत न्याहारी,रसोई मराठी खाद्य परंपरा ही पुस्तके पण लिहिली आहेत.

विष्णू मनोहर हे खाद्यप्रांतात रमले असले तरी त्यांनी अभिनेता म्हणून त्यांनी २ मराठी चित्रपट तर १ हिंदी चित्रपट केला आहे.त्यांना प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या सोबत काम केले.

चित्रपटांची नावे :-

१)झुंज एकाकी.

२)हंबरडा.

३)हॉली बास्टर्ड (हिंदी चित्रपट).

त्यांनी लहान मुलांकरिता ”बारू द वंडर किड” हा अनिमेटेड(सजीव भासणारी चित्रे) चित्रपट दिग्दर्शित आणि निर्मित केला आहे. त्यांनी ‘Once मोअर’ या मराठी चित्रपटात पण केले आहे. या चित्रपटाची निर्मितीही त्यांचीच आहे. या चित्रपटात त्यांनी एका राजाची व्यक्तिरेखा साकारली आहे. या चित्रपटात विष्णू मनोहर यांच्यासोबत रोहिणी हट्टंगडी, पूर्णिमा तळवलकर, भारत गणेशपुरे, नरेश बीडकर आशुतोष पत्की आणि धनश्री दळवी आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे लेखन श्वेता बिडकर यांनी केले आहे. धनश्री विनोद पाटील, सुहास जहागीरदार, निलेश लवंदे, विष्णू मनोहर आणि डॉ. विनित बांदिवडेकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अभय ठाकूर, सुदिप नाईक, संपदा नाईक आणि व्ही.टी एच.एटंरटेन्मेंट सहनिर्माते आहेत.

त्यांचे स्वतःचे संकेतस्थळ www.vishnumanohars.com हे असून,यावर त्यांच्या साऱ्या पाककृती आहेत.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..