नवीन लेखन...

ज्येष्ठ सिनेसमीक्षक अशोक उजळंबकर

अशोक उजळंबकर हे १९८२ पासून हिंदी चित्रपट समीक्षा लेखनात सक्रिय आहेत. वयाच्या सहाव्या वर्षापासून चित्रपट बघण्याची आवड निर्माण झाली. आवड आणि व्यवसाय एकच असल्याने त्यांचे लेखनही रसिक प्रिय होत गेले. त्यांचा जन्म १० जून १९५० रोजी नळदुर्ग महाराष्ट्र येथे झाला. त्यांचे शिक्षण बीए , बीएड, एमए व बॅचलर ऑफ जर्नालिझम डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी येथे झाले. पुढे विज्ञान वर्धिनी हायस्कुल, औरंगाबाद येथे त्यांनी इंग्रजी विषयाचे सहशिक्षक म्हणून १९६८ ते १९९८ दरम्यान काम केले. १९९० ते २०१० दरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ते गेस्ट लेक्चरर म्हणून कार्यरत होते. याच दरम्यान मौलाना आझाद हॉर्निमन कॉलेज ऑफ जर्नालिझम व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथेही ते गेस्ट लेक्चरर म्हणून कार्य करीत होते.

‘अजिंठा’, ‘मराठवाडा’ या दैनिकांपासून त्यांनी चित्रपट समीक्षा लेखनास आरंभ केला. महाराष्ट्रातील विविध दैनिकांत चित्रपट, दूरदर्शन या विषयावर जसे दैनिक लोकमत, सकाळ, तरुण भारत, मराठवाडा, अजिंठा इत्यादी ठिकाणी त्यांनी विपुल प्रमाणात स्तंभ लेखन केले आहे. चित्रपट समीक्षक म्हणून आजवर त्यांनी तब्बल ३३६५ मुलाखती घेतल्या आहेत. चित्रपट विषयास वाहिलेला नवरंग रुपेरी नामक दिवाळी अंकाची स्थापना त्यांनी १९८७ साली केली व जवळपास ३० वर्षे त्याचे संपादन केले.

नवरंग रुपेरी अंकास आतापर्यंत उत्कृष्ट दिवाळी अंकाचे तब्बल ३५ राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने विद्यारत्न प्रतिष्ठान, पुणे , शब्दसागर उद्योगवेध, पुणे, रोटरी क्लब पुणे पर्वती-लोकमान्य नगर, साहित्य विचार मंथन, कल्याण, साहित्य दरवळ मंच, दादर, अक्षररंग व्यासपीठ, कल्याण, नीलनंदा फाउंडेशन, मुंबई, मराठी वृत्तपत्र लेखक संघ, करवीर काशी फाउंडेशन, कोल्हापूर व पत्र सारांश प्रतिष्ठान, इंदौर यांचा समावेश आहे.

१९९५ साली त्यांनी साई ऍडव्हर्टायजर्स या जाहिरात संस्थेची व अजिंक्य जनसंपर्क सल्ला संस्थेची स्थापना केली. अजिंक्य प्रकाशन या प्रकाशन संस्थेची स्थापना सुद्धा त्यांनी केली. चित्रपट विषयाच्या विविध पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले आहे. चित्रपट विषयावर त्यांची आजवरची प्रसिद्ध पुस्तके जसे तुम्हे याद होगा (हिंदी चित्रपटाचा इतिहास), रसिक बलमा (हिंदी चित्रपट संगीत), लाईट्स कॅमेरा ऍक्शन (४० हिंदी चित्रपट दिग्दर्शकांचा प्रवास), मोहें भूल गये सांवरिया (हिंदी चित्रपटातील नायिका), वो जाब याद आये (हिंदी चित्रपटातील गायक), इत्यादी चित्रपट माध्यमावर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता अत्यंत मार्गदर्शक आहेत. २०१९ मध्ये अशोक उजळंबकर यांचा ‘वो जब याद आये’हा चित्रपट संगीतातील गायक- गायिकांचा परिचय करून देणारा लेखाजोखा पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाला आहे.

पंकज मलिक, जी. एम. दुराणी, सुरेंद्र, नूरजहाँ, शमशाद बेगम, सुरैया, जगजित कौर, तलत महमूद, महंमद रफी, मुकेश, लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, मन्ना डे, सुमन कल्याणपूर, किशोर कुमार आदी २६ गायक-गायिकांची ओळख उजळंबकर यांनी आपल्या ‘वो जब याद आये’ या संग्रहात करून दिली आहे. त्यांचे पुस्तक ‘लाईट्स कॅमेरा ऍक्शन’ पुस्तकाचे विमोचन २०१४ साली व्हिस्टलिंग वुड्स इंटरनॅशनल, मुंबई येथे सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई यांच्या हस्ते झाले होते. चित्रपट संगीतावर आधारित विविध दृक श्राव्य कार्यक्रमांचे संचालनही ते करीत असतात. यात प्रामुख्याने बिनाका गीतमाला, चार चौघी, महाराष्ट्र भूषण सुलोचना, अशी मी जयश्री, मधुबाला ते माधुरी दीक्षित, एक शाम साहिर के नाम इत्यादी कार्यक्रमांचा समावेश करता येईल. सध्याला ते औरंगाबादेतील सुप्रसिद्ध नारायणराव उजळंबकर सार्वजनिक वाचनालयाचे सचिव म्हणून काम पाहतात. १९६६ मध्ये स्थापित औरंगाबादेतील टीचर्स एज्युकेशन सोसायटीचे ते कोषाध्यक्ष आहेत. ते रोटरी क्लब ऑफ औरंगाबादचे माजी सदस्य व सचिव आहेत व रोटरीमध्ये पॉल हॅरिस फेलो पुरस्काराने सन्मानित आहेत. हिंदी सिनेजगताची इत्थंभूत माहिती, संकलन अशोक उजळंबकर यांच्या कडे आहे. गायक, गायिका, कलावंतांच्या अनेक आठवणी, किस्से त्यांच्याकडे असतात.

अशोक उजळंबकर यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा चित्रकर्मी पुरस्कार, आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान, पुणे यांचा आचार्य अत्रे चित्रकर्मी पुरस्कार, बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाउंडेशन, पुणे यांचा साहिर लुधियानवी पुरस्कार, चौथा स्तंभ तर्फे उत्कृष्ट फिल्म जर्नालिस्ट पुरस्कार -२०११, कोकण मराठी साहित्य परिषदेचा भाई भगत स्मृती पुरस्कार- तुम्हे याद होगा या ग्रंथास- २०११, अविष्कार सोशल फाउंडेशन तर्फे उत्कृष्ट सिनेमा समीक्षक पुरस्कार-२००९, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक तर्फे सन्मान -२००९, अमरावती येथील सोसायटी ऑफ इंडियन रेकॉर्ड कलेक्शन व पारिवारिक संगीत सभा यांच्या तर्फे सन्मान- अनुक्रमे २००९ व २००७-०८ ,मरुस्थळ उदय दंताळे पुरस्कार-२०१३, फॅक्टरी १०० वर्षाची- समीक्षा पुरस्कार-२०१२, इंडियन मेडिकल असोसिएशन, कोल्हापूर सन्मान- २००७-०८, एकता सेवाभावी संस्था तर्फे महाराष्ट्र गौरव पुरस्कार-२००६, महाराष्ट्र ग्रंथालय पुरस्कार- २००६-०७, अक्षरमंच सांस्कृतिक व्यासपीठ, कल्याण तर्फे उत्कृष्ट संदर्भ ग्रंथ पुरस्कार- लाईट्स कॅमेरा ऍक्शन पुस्तकास- २०१५, यादें सिनेसंगीत क्लब, सातारा-२००६, इंडियन रेडियोलॉजिकल असोसिएशन-२००६, नवनीत सन्मान-लेखक तुमच्या भेटीला, सकल ब्राह्मण समाज समिती सन्मान व सत्कार, प्रगतिशील ज्येष्ठ नागरिक संघटना रौप्य महोत्सव पुरस्कार, रोटरी पॉल हॅरिस फेलो सन्मान असे अनेक सन्मान व पुरस्कार मिळाले आहेत.

— संजीव वेलणकर. 

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..