ज्येष्ठ संगीतकार रामकृष्ण शिंदे म्हणजेच संगीतकार हेमंत केदार यांचा जन्म १९ एप्रिल १९१८ रोजी मालवण सिंधुदुर्ग येथे झाला.
रामकृष्ण शिंदे यांच्या परिवाराच्या म्हणण्यानुसार १९१८ साली रामनवमीच्या दिवशी त्यांचा जन्म झाला. रामकृष्ण शिंदे यांच्या वडिलांचे त्यांच्या लहानपणीच निधन झाले त्या मुळे सर्व कुटुंब मुंबईला आले.
सुरवातीला रामकृष्ण शिंदे यांनी मराठी नाटकांच्या साठी संगीत देण्यास सुरूवात केली.त्यांनी बनवलेल्या बंदिशी खूप गाजल्या त्या मुळे त्याचे नाव नाट्य सृष्टीत गाजले होते.
रामकृष्ण शिंदे यानी हेमंत केदार या नावाने संगीत दिले. रामकृष्ण शिंदे यांनी १९४७ साली आलेल्या ‘मॅनेजर’ चित्रपटाने आपले करियर सुरूवात केले. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते आई.पी.तिवारी व मुख्य कलाकार होते जयप्रकाश, पूर्णिमा, गोबिंद, सरला, अज़ीज़, अमीना व तिवारी.
‘मॅनेजर’, ‘बिहारी’, ‘किसकी जीत’, ‘गौना’, ‘ख़ौफ़नाक़ जंगल’, ‘पुलिस स्टेशन’ व ‘कैप्टन इण्डिया’ हे त्यांचे इतर काही चित्रपट होत. रामकृष्ण शिंदे यांनी दोन मराठी दोन चित्रपटाना संगीत दिले होते. १९६६ मध्ये आलेला ‘तोची साधु ओळाखावा’ व १९७० साली आलेला ‘आई आहे शेतात’ चित्रपट, या चित्रपटाची निर्मिती रामकृष्ण शिंदे यांनी केले होते. या शिवाय रामकृष्ण शिंदे यांनी ऑल इण्डिया रेडियोच्या ‘होनाजी बाला’, ‘बिल्ली मौसी की फजीहत’, ‘सोना और सात बौने’, ‘मानसी’ व ‘उषा मुस्काई’ अशा कार्यक्रमाना संगीत दिले होते. रामकृष्ण शिंदे यांचे निधन झाले तेव्हा ते ‘चाण्डालिका’ व दूरदर्शनसाठी अजित सिन्हा के बैले ‘ऋतुचक्र’ साठी संगीत देत होते.
रामकृष्ण शिंदे यांचे १४ सप्टेंबर १९८५ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply