नवीन लेखन...

ज्येष्ठ क्रिकेटपटू सर व्हिवियन रिचर्ड्‌स

ज्येष्ठ क्रिकेटपटू सर व्हिवियन रिचर्ड्‌स यांचा जन्म ७ मार्च १९५२ रोजी झाला.

सर व्हिवियन रिचर्ड्‌स यांचे पूर्ण नाव आयझेक व्हिवियन अलेक्झांडर रिचर्डस.

सर व्हिवियन रिचर्ड्‌स यांनी आपल्या टेस्ट करियरची सुरुवात भारताविरोधात केली होती. २२ नोव्हेंबर १९७४ रोजी बंगळुरुमध्ये झालेल्या कसोटीत त्यांनी पदार्पण केले होते. रिचर्ड्स जेव्हा मैदानात फलंदाजी करण्यास जात असत तेव्हा खेळ बघणारांचा श्वास थांबत असे. जबरदस्त चौकार आणि उंच षटकार मारणारे रिचडर्स त्याकाळी क्रिकेटशौकिनांत लोकप्रिय व्यक्तीमत्त्व होते. सर व्हिवियन रिचर्ड्‌स यांची क्रेझ आजही क्रिकेट जगतामध्ये कायम आहे.

१८७ एकदिवसीय सामन्यांमधुन ४७ च्या सरासरीने सर व्हिवियन रिचर्ड्‌स यांनी ६५०० पेक्षा अधिक धावा काढल्या आहेत. तर विश्वचषकात रिचर्ड्‌स यांनी ४ विश्वचषकात २३ सामन्यात ६३ पेक्षा सरासरीने १००० पेक्षा धावा. रिचर्डस बद्दल पुरेसा दरारा विचारा, इंग्लिश गोलंदाजांना. च्युइंगगम चघळत चघळत रिचर्ड्‌स नुसता मैदानात येताना दिसला की गोलंदाजांना धडकी भरायची. त्या च्युइंगगम चघळणार्या चेहेऱ्यावर एक कमालीचा थंडपणा असायचा. जंगलात सिंह जसा आजुबाजुला कोण आहे याची पर्वा न करता येतो तसा तो यायचा. तो त्या मैदानावरचा राजा असायचा. उगाचच नाही त्याला किंग म्हणायचे. त्याच्या चेहेऱ्यावर येताना कमालीचे तुच्छ भाव असायचे. तोंडातुन तो एक चकार शब्द नाही काढायचा (बॅटिंग करताना. फिल्डींग करताना तो पंचांवर दबाव आणण्यासाठी प्रसिद्ध होता). पण त्याच्या चेहेऱ्यावरुन तो गोलंदाजाला किती किरकोळीत बडवणार आहे ते दिसायचे. आणि तसेच व्हायचे. रिचर्डस नावाच्या वादळात बहुतेक सगळे गोलंदाज पाल्यापाचोळ्यासारखे उडुन जायचे. लिली, थॉमसन, कपिल देव, इम्रान खान, इयान बॉथम, गार्नर, मार्शल असे दादा लोक गोलंदाजी करत असुनसुद्धा त्याने कारकीर्दीत एकदाही हेल्मेट वापरले नाही. हा या सगळ्यांचा धडधडीत अपमान होता. पण रिचर्डसकडे याच्याही पलीकडे जाउन गोलंदाजांना अपमानित करण्याची कला अवगत होती. उसका बल्ला बोलता था. १९८३ च्या विशवचषकापर्यंत तर रिचर्डस हे दंतकथेचा नायक झाले होते. ८ सामन्यांत ७३ च्या सरासरीने त्यांनी साडेतीनशे हुन आधिक धावा केल्या. जसा जलवा मैदानावर होता, तसाच काहीसा जलवा मैदानाबाहेर होता. त्याकाळच्या प्रत्येक हसीना रिचर्ड्सच्या थिप्पाड शरीरयष्टी आणि उंचीमुळे फिदा व्हायची. पहिले त्यांचे प्रेम होते बॅटने चेंडूची पिटाई करणे आणि दुसरे सगळ्यात प्रसिद्ध अफेयर राहिले नीना गुप्ता, रिचर्ड्स जेव्हा १९८० साली भारतात दौ-यावर आले होते तेव्हा त्यांची एका कार्यक्रमात अभिनेत्री नीना गुप्तासोबत झाली. पहिल्या भेटीतच ते एकमेंकाच्या प्रेमात पडले. नीना रिचडर्सच्या प्रेमात आकंड बुडाली. रिचडर्स यांचे लग्न झाले असतानाही नीनाने त्यांच्यासोबत संबंध ठेवला. त्यातून नीना आणि रिचडर्स यांना एक मुलगी झाली. आता ती मुलगी ३० वर्षाची असून तिचे नाव मसाबा ठेवण्यात आले आहे. सध्या ती मॉडेलिंगमध्ये करिअर बनवित आहे. विवियन रिचर्ड्स यांची भारतीय मुलगी आपली आई नीना गुप्ताला रोल मॉडेल मानते. मसाबा आज एक यशस्वी फॅशन डिझायनर आहे. मोठे-मोठे फॅशन शोमध्ये तिने डिझाइन केलेल्या कपड्याचे प्रदर्शन लागते. मसाबा विल्स लायफस्टाईलचे कित्येक अवार्ड्स जिंकली आहे. सर विवियन रिचर्ड्स यांना ऑस्ट्रेलिया नाही, इंग्लंड नाही तर, भारतातील जयपूर हॉटेल रामबाग पॅलेस सगळ्यात जास्त पसंद आहे.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..