नवीन लेखन...

ज्येष्ठ दिग्दर्शक प्रभाकर पेंढारकर

ज्येष्ठ दिग्दर्शक प्रभाकर पेंढारकर जन्म ७ सप्टेंबर १९३३ रोजी झाला.

प्रभाकर पेंढारकर हे चित्रतपस्वी भालजी पेंढारकरांचे सुपुत्र असलेल्या पेंढारकर यांनी अनेक दर्जदार चित्रपटांची निर्मिती केली.

प्रभाकर पेंढारकर यांनी १९५२ ते १९५९ पर्यंत भालजी आणि व्ही. शांतराम यांच्या हाताखाली सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. १९६१ पासून त्यांनी फिल्म डिव्हिजन सोबत काम केले.

भारतीय फिल्म डिव्हिजनच्या माध्यमातूनही अनेक डॉक्यूमेंटरीज त्यांनी तयार केल्या होत्या. भारतीय सैन्याच्या अभियांत्रिकी विभागाची एक शाखा म्हणजे ‘बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन’ जे भारताच्या सीमावर्ती भागांमध्ये रस्ते बांधण्याचे बिकट काम करते. त्यांच्यावर डॉक्यूमेंटरी बनवतांना पेंढारकरांना ‘रारंग ढांग’ ह्या कादंबरीची कल्पना सुचली आणि मराठी साहित्यातलं एक मंत्रमुग्ध करणारं लेणं त्यांनी घडवलं.

स्वतः लेखकच चित्रपट दिग्दर्शक व पटकथा लेखक असल्याने ‘रारंग ढांग’ हे पुस्तक वाचताना एखादा सुंदर चित्रपट पाहतो आहोत असंच वाटत राहातं. अमोल पालेकर यांनी रारंग ढांगवर चित्रपट बनविण्याचा प्रयत्न केला होता पण संरक्षण खात्याने परवानगी नाकारली होती. (ज्याने कोणी ही कादंबरी वाचली असेल त्याला ह्या मागचे कारण सहज उमजेल) पेढारकरांनी सुनामी संकटावर ‘चक्रीवादळ’, काश्मीरच्या धगधगत्या पार्श्वभूमीवरची ‘आणि चिनार लाल झाला’ अश्या इतरही चांगल्या कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांना सर्वोत्तम शैक्षणिक चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांनी १९६१ मध्ये भाव तिथं देव, १९८१ मध्ये बाल शिवाजी, १९८६ मध्ये शाब्बास सुनबाई हे चित्रपट बनवले.

भालजी पेंढारकर यांचे सुपुत्र.. ‘प्रतीक्षा’, ‘आणि चिनार लाल झाला’, ‘रारंगढांग’ या कादंबऱ्यांसह ‘एका स्टुडिओचे आत्मवृत्त’ या पुरस्कार विजेत्या पुस्तकाचे लेखक.. ‘फिल्म्स डिव्हिजन’मध्ये घडविलेली कारकीर्द.. असा प्रभाकर पेंढारकर यांचा जीवनप्रवास ‘एक परीसस्पर्श’ या लघुपटाद्वारे उलगडला आहे.

पेंढारकर यांच्याकडे लेखन सहायक म्हणून काम करण्याच्या माध्यमातून त्यांचा सहवास लाभलेल्या यशस्विनी गोडसे यांनी ‘प्रभाकर पेंढारकर-एक परीसस्पर्श’ या लघुपटाची निर्मिती केली आहे. त्यांचे पती डॉ. मोहन गोडसे हे या लघुपटाचे निर्माते असून पेंढारकर यांच्यासमवेत फिल्म डिव्हिजनमध्ये काम केलेले अरुण गोंगाडे लघुपटाचे सहदिग्दर्शक होते.

प्रभाकर पेंढारकर यांचे ७ ऑक्टोबर २०१० रोजी निधन झाले.

प्रभाकर पेंढारकर‘एक परीसस्पर्श’हा लघुपट.

https://www.youtube.com/watch?v=wibC6j6FBek

“रारंग ढांग” शुभांगी गोखले लेखक: प्रभाकर पेंढारकर

https://www.youtube.com/watch?v=ZaMEe4XudoU

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..