श्याम बेनेगल यांचा जन्म १४ डिसेंबर १९३४ रोजी झाला.
श्याम बेनेगल यांनी चित्रपट सृष्टीत भरीव योगदान दिले आहे. आजही अशाप्रकारचे योगदान देण्यामध्ये सक्रिय आहेत. त्यांनीच स्मिता पाटील यांची ‘निशांत’, ‘मंथन’, ‘भूमिका’ आणि ‘मंडी’ चित्रपटासाठी निवड केली होती. त्यांनी स्मिता पाटील यांना पहिल्यांदा बातम्या वाचताना पाहिले होते.
स्मिता एका राजकीय घराण्यातून पुढे आलेली मुलगी होती. शबाना आझमी ऐवजी स्मिता पाटील यांची चित्रपटासाठी निवड केल्याचे अनेकांना आश्चर्य वाटत होते. कारण स्मिता ही रंगाने तशी सावळी आणि दिसायला सर्वसाधारण मुलीसारखी होती. स्मिता पाटील यांचे सुप्त गुण हेरून दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी निशांत (१९७५) व चरणदास चोर (१९७५) या चित्रपटांत त्यांना अभिनयाची संधी दिली. हिंदी चित्रपटसृष्टीतील पर्दापणानंतर गुजरात मधील सहकारी दूधचळवळीवर आधारित मंथन (१९७६) व सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री हंसा वाडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारलेला भूमिका (१९७७) या बेनेगल यांनीच दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. भेदक आणि बोलके डोळे यांचा वापर करून त्यांनी केलेल्या संवेदनशील अभिनयामुळे त्यांना कलात्मक चित्रपटसृष्टीत मान्यता मिळाली. सावळा वर्ण असला, तरी विलक्षण बोलका (फोटोजेनिक) चेहरा हेही त्यांचे वैशिष्ट्य होते. याच बळावर त्यांनी भारतीय सिनेमात सत्तरीच्या दशकापासून प्रवाहित झालेल्या समांतर सिनेमातील वास्तववादी भूमिका साकारल्या आणि वास्तववादी अभिनय शैलीचा प्रत्यय जगभरातील सिनेरसिकांना दिला. ‘मंडी’ या चित्रपटाची कथा साहित्यकार गुलाम अब्बास यांच्या ‘आनंदी’ कादंबरीची ही कथा होती.
श्याम बेनेगल यांनी गेल्या अर्ध्या शतकात चांगल्या चित्रपटांची निर्मिती केली, पण या काळात त्यांनी कधीही तडजोड केली नाही. त्यांची प्रतिभा व्यापक आणि विलक्षण आहे. एकीकडे त्यांनी ‘सूरज का सातवां घोडा’वर चित्रपट बनवला, तर दुसरीकडे पंडित नेहरू यांच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’वर त्यांनी मालिका बनवली. शशी कपूरसाठी श्याम बेनेगल यांनी ‘जुनून’ हा चित्रपट बनविला, तर दूध सहकारी संघाच्या सदस्यांच्या वर्गणीतून ‘मंथन’ची निर्मिती केली.
बेनेगल यांनी विविध विषयांवर चित्रपट बनवताना अनेक कलाकारांना संधी मिळवून दिली आणि त्यातील अनेक जण एकेकाळचे आघाडीचे कलाकार बनले. त्यामध्ये अमरीश पुरी, नसिरुद्दीन शहा, ओम पुरी, कुलभूषण खरबंदा, शबाना, स्मिता, अन्नू कपूर आदींचा समावेश आहे.
श्याम बेनेगल या वयातही दररोज ताडदेव येथील एव्हरेस्ट इमारतीत असलेल्या त्यांच्या कार्यालयात येऊन काम करतात.
श्याम बेनेगल यांना आपल्या समुहाकडुन वाढदिवसाच्या शुभेच्छा.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply