नवीन लेखन...

ज्येष्ठ नाट्य समीक्षक, विचारवंत प्रा. पुष्पा भावे

ज्येष्ठ नाट्य समीक्षक, विचारवंत प्रा. पुष्पा भावे यांचा जन्म २६ मार्च १९३९ रोजी मुंबई येथे झाला.

एक विचारवंत लेखिका, नाटक आणि रंगभूमी विषयी भरपूर लेखन आणि टीकात्मक समीक्षा करणार्याव लेखिका म्हणून पुष्पा भावे ओळखल्या जात. मुंबईतल्या मध्यमवर्गीय कुटुंबात पुष्पा भावे यांचा जन्म झाला. माहेरच्या त्या पुष्पा सरकार. उत्कृष्ट लेखनाबरोबर त्या एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ही प्रसिद्ध होत्या. सामाजिक कार्याची त्यांना मुळातच आवड होती त्या मुळे पुष्पा भावे या एक प्रभावी वक्त्या राहिल्या होत्या. विद्यार्थिदशेपासून राष्ट्र सेवा दल आणि लोकशाहीवादी चळवळींशी पुष्पाताईंचा संपर्क होता. त्यांचे उच्चशिक्षण एलफिस्टन महाविद्यालयात झाले. मराठी व संस्कृत हे विषय घेऊन त्यांनी एम. ए. ची पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर मुंबई येथे सिडनहॅम महाविद्यालयात त्या प्राध्यापक म्हणून रूजू झाल्या. त्यानंतर दयानंद कॉलेज, म. ल. डहाणूकर महाविद्यालय आणि चिनॉय महाविद्यालय येथे त्यांनी मराठीचे अध्यापन केले आणि रुईया कॉलेजमधून त्या निवृत्त झाल्या. रूढार्थाने मराठीच्या प्राध्यापक आणि विद्यार्थिप्रिय शिक्षक या नात्याने अध्यापन क्षेत्रात कार्यरत असताना केवळ हस्तिदंती मनोऱ्यात राहण्याऐवजी क्रियाशील स्वभावामुळे त्या सातत्याने समाजाशी जोडल्या गेल्या.

संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवामुक्ती आंदोलन अशा सत्याग्रहांमध्ये भाग घेत त्यांनी ही नाळ यशस्वीपणे सांभाळली. म्हणूनच स्वातंत्र्योत्तर काळात महागाईविरोधी आंदोलनामध्ये अहिल्याताई रांगणेकर आणि मृणाल गोरे यांच्यासमवेत पुष्पा भावे यांनी लाटणे मोर्चात हिरिरीने सहभागी झाल्या होत्या. मुंबईतील गिरणी कामगार संघर्ष समितीच्या चळवळीला वैचारिक मार्गदर्शन करण्यापासून कामगारांना हक्काचे घर मिळावे यासाठी सरकारशी संघर्ष करण्यात पुष्पाताई अग्रभागी होत्या. स्त्रीवादी चळवळीची पाठराखण करणाऱ्या पुष्पा भावे यांनी दलित स्त्रियांच्या संघटनेमध्ये स्वतंत्र वैचारिक भूमिका घेत संघटन केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये त्या आरंभापासून काम केले होते. डॉ. बाबा आढाव यांच्या असंघटित कामगार चळवळीत हमाल, रिक्षावाले, कागद-काच-पत्रा वेचणारे अशा कष्टकऱ्यांच्या आंदोलनांमध्ये त्या समर्थक राहिल्या होत्या. सामाजिक कृतज्ञता निधी या सामाजिक कार्यकर्त्यांना मानधन देणाऱ्या उपक्रमामध्ये पुष्पा भावे सतत अग्रभागी असत.
साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक निधी, अनुवाद सुविधा केंद्र, भारत-पाकिस्तान पीपल्स फोरम फॉर पीस अॅुण्ड डेमॉक्रसी, मृणाल गोरे साऊथ एशियन सेंटर, केशव गोरे स्मारक ट्रस्ट, मानवी हक्कांसाठी काम करणारी मेहेर संस्था अशा विविध संस्था-संघटनांमध्ये पुष्पाताई पदाधिकारी म्हणून काम केले होते. त्यांनी अनेक विषयांवर लेखन केले. त्यापैकी ‘अभिरूची:ग्रामीण आणि नागर’ (संपादक – गो. म. कुलकर्णी, ‘मराठी टीका’ (संपादक – वसंत दावतर), ‘महात्मा फुले गौरव ग्रंथ’ इ. ग्रंथांसाठी त्यांनी लिखाण केले आहे. या शिवाय विविध ज्ञानविस्तार लेख सूचीचे संकलनही त्यांच्या नावावर आहे.

‘गुड मुस्लीम, बॅड मुस्लीम’ या महमूद ममदानी यांच्या गाजलेल्या इंग्रजी पुस्तकाचाही पुष्पा भावे यांनी मराठी अनुवाद केला आहे. गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ सामाजिक प्रश्न आणि चळवळी यांच्याशी केवळ जोडल्याच गेलेल्या नव्हे तर आधारस्तंभ राहिलेल्या पुष्पाताईंना समाजकार्याबद्दल महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तसेच त्यांना मराठवाडय़ातील ध्येयवादी संपादक अनंतराव भालेराव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने गौरवण्यात होते.

पुष्पा भावे यांचे निधन ३ ऑक्टोबर २०२० रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..