ज्येष्ठ रंगकर्मी अनंत मिराशी यांचा जन्म २१ सप्टेंबर १९३४ रोजी झाला.
ज्येष्ठ रंगकर्मी अनंत मिराशी हे मुळचे कोल्हापूरचे. अनंत मिराशी यांनी अनेक ख्यातनाम संस्थांच्या अनेक चित्रपट, मालिका आणि मुख्यत: नाटकांतून विविध प्रकारच्या अनेक भूमिका साकारल्या.
आय एन टी, दुर्वांची जुडी, रंगमंच, मुंबई, नाट्यसंपदा, रंजन कला मंदिर या नाट्यसंस्थांमधून त्यांनी अनेक भूमिका साकारल्या. रंगमंच, मुंबई या संस्थेच्या नटसम्राट, रायगडाला जेव्हा जाग येते, असं झालंच कसं?, मी तर बुवा अर्धाच शहाणा या नाटकांत त्यांनी भूमिका केल्या होत्या. तसेच दुर्वांची जुडीमधील त्यांच्या ‘बाळू आपटे’ या पात्राला खूप प्रसिद्धी मिळाली होती.
अनंत मिराशी यांचे १३ जून २०२० रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply