ज्येष्ठ संपादक पत्रकार आणि साहित्यिक उत्तम कांबळे यांचा जन्म ३१ मे १९५६ रोजी झाला.
आज उत्तम कांबळे यांना पत्रकार..संपादक..लेखक म्हणून जग ओळखते. कोल्हापूर जिल्ह्यातील टाकळीवाडी गावी शेतमजूर कुटुंबात त्यांचा जन्म झाला. उत्तम कांबळे यांचे मूळ गाव बेळगावमधील शिरगुप्पी आहे. उत्तम कांबळे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण टाकळीवाडी व बेळगावमधील रायबागमध्ये झाले. राज्यशास्त्रात पदवी घेतली. उत्तम कांबळे हे त्यांच्या कुटुंबातील शिकलेली पहिली व्यक्ती आहेत. प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असल्याने, कंपाउंडर, बाइंडर, वर्तमानपत्रविक्रेता, हमाली, आणि बांधकाम आणि अन्य मजुरीची कामे करीत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यांनी ठाणे येथे झालेल्या ८४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलनाचे अध्यक्षपदही भुषविले.
त्यांची काही विस्तारीत माहिती. कांबळ्यांनी शिक्षणानंतर त्यांनी काही काळ कॉलेजांमध्ये नोकरी केली. त्यांनी शिवाजी विद्यापीठातील वृत्त विद्या विभागात दोन वर्षे, आणि नाशिकच्या एच.पी.टी कॉलेजमध्ये दोन वर्षे अध्यापन केले.
उत्तम कांबळे यांनी १९७९ मध्ये कोल्हापूरच्या दैनिक ’समाज’मधून त्यांनी पत्रकारितेला प्रारंभ केला. १९८२ मध्ये ते सकाळमध्ये बातमीदार म्हणून रुजू झाले. मे २००९ पासून ते सकाळ समूहाचे मुख्य संपादक म्हणून काम पाहत असत. ‘सकाळ’च्या सप्तरंग पुरवणीत ते ‘फिरस्ती’ नावाचे सदर लिहीत असत. त्यांतल्या निवडक २५ लेखांचे पुस्तक ‘उजेड अंधाराचं आभाळ’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे. विविध समस्यांवर मात करत लढणार्या माणसांच्या व्यक्तिरेखा या लेखांतून त्यांनी रेखाटल्या आहेत.
Leave a Reply