जन्म. १० जानेवारी १९०१ पनवेल येथे.
इतिहासकार ग ह खरे हे वि का राजवाड़े ह्यांचे शिष्य, ज्यांनी अविवाहित राहून इतिहास संशोधनाला वाहून घेतले होते. ग ह खरे ह्यांचे माध्यमिक शिक्षण द्रविड हायस्कूल, वाई येथे झाले. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना पहिल्याच वर्षी महात्मा गांधी ह्यांच्या असहकारितेच्या चळवळीत सहभागी होऊन त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण सोडले.कोयना धरणामुळे विस्थापित होणाऱ्यांचे पुनर्वसन व्हावे आणि त्यांना योग्य ती भरपाई मिळावी ह्यासाठी खरे ह्यांनी प्रचाराची मोहीम राबवली. परिणामी ह्यांच्यावर अशांतता माजवत असल्याचा आरोप ठेवण्यात आला आणि त्यांना १२ ऑगस्ट १९२२ पासून १ वर्ष बंदीवासाची शिक्षा देण्यात आली. सुटके नंतर इतिहास अभ्यास सुरु केला त्यांनी ब्राह्मी आणि उर्दू ह्या लिप्यांचेही अध्ययन करून त्या आत्मसात केले. शिलालेखांचे ठसे घेण्याचे काम ते स्वतःच अभ्यास करून शिकले. १९२९ पासून भारत इतिहास संशोधक मंडळ येथे नोकरी, पण नंतर निधना पर्यंत, चिटणीस, कार्याध्यक्ष, या नात्यानी संस्थेची भरीव सेवा त्यांनी केली.
संस्कृत, हिंदी, फ़ारसी, कन्नड़, कोकणी भाषा त्यांना अवगत होत्या, नाणकशास्त्र, पुरतत्वविद्या, मूर्तिविज्ञान, पुरालेखविद्या ह्या विषयात त्यांचा व्यासंग होता, भारतात त्यांनी सर्वत्र संचार केला होता, लहानमोठी ५३ पुस्तक, ४०० पेक्षा अधिक संशोधनपर लेख प्रकाशित झालेत, ह्यांनी शिवचरित्रसाहित्य काही खंड व ऐतिहासिक फार्सी साहित्याचे ६ खंड संपादित केले. ग ह खरे सुमारे २०,००० पोथ्या, ५००० नाणी, १५० चित्रे आणि ३० ताम्रपट व शिलालेख संग्रह करून भारत इतिहास संशोधक मंडळाला दिले, हे सर्व करत असताना त्यांनी काही विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन केले त्यात अग्रक्रमांक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, श्री गजानन भास्कर मेहेंदळे, श्रीमती शोभना गोखले ह्यांचा आहे ज्यांनी पुढे स्वकर्तुत्व स्वतः चा वेगळा ठसा स्वतः च्या कामातुन दाखवला. संशोधकाचा मित्र, श्रीविठ्ठल आणि पंढरपूर, मूर्तिविज्ञान, महाराष्ट्राची चार दैवते, हे त्यांच्या ग्रंथ संपदेतील विशेष व महत्वाचे ग्रंथ.
त्यांचा अनन्यसाधारण कामाकर्ता त्यांना मानसन्मान म्हणून त्यांना इंडियन हिस्टॉरिक कमिशनवर भारत इतिहास संशोधक मंडळाचे प्रतिनिधी म्हणून ३० वर्षे सहभाग होता, तसेच इंडियन हिस्टरी काँग्रेसच्या १९५१च्या अधिवेशनात मध्ययुगीन शाखेचे अध्यक्षपद त्यांनी भूषावले होते. न्युमिस्मॅटिक सोसायटी ऑफ इंडिया ह्या संस्थेच्या १९७४च्या अधिवेशनाचे अध्यक्षपदही त्यांच्या कड़े होते, पुणे विद्यापीठानी १९८४ साली सन्माननीय डी लिट् पदवी प्रदान केली.
डॉ ग ह खरे यांचे ५ जून १९८५ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply