
ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत, कॉंग्रेसचे राज्यसभेतील खासदार श्री कुमार केतकर यांनी गेली अनेक वर्षे इंग्रजी आणि मराठी पत्रकारितेत भरीव योगदान दिले आहे.
कुमार केतकर यांचा जन्म ७ जानेवारी १९४६ रोजी झाला. त्यांची वैशिष्ठे म्हणजे कठोर चिकित्सा, परखड विश्लेषण आणि अनेकविध विषयांतील संचार.
कुमार केतकर हे दैनिक लोकसत्ता चे निवृत्त प्रमुख संपादक. तसेच महाराष्ट्र टाईम्स आणि लोकमत या वृत्तपत्रांचे माजी मुख्य संपादक होते. ‘डेली ऑब्झर्वर’चे निवासी संपादक तसेच इकोनॉमिक टाइम्सचे विशेष प्रतिनिधी म्हणूनहूी कुमार केतकरांनी काम केलेले आहे. संपादकपदाच्या कारकिर्दीत ते अखेरीस ‘दिव्य मराठी’ या वृत्तपत्राचे संपादक होते.
“बदलते विश्व‘, “विश्वामित्राचे जग‘, “त्रिकालवेध‘, “ओसरलेले वादळ‘, “शिलांगणाचे सोने‘, “मोनालिसाचे स्मित‘, “ज्वालामुखीच्या तोंडावर‘, “कथा स्वातंत्र्याची‘ ही त्यांनी लिहिलेली पुस्तके.
भारत सरकारने २००१ साली पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला आहे.
राज्यसभेचे खासदार म्हणुन कुमार केतकर सध्या काम करत आहेत.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
(श्री कुमार केतकर हे `मराठीसृष्टी’चे पहिल्या दिवसापासून एक मार्गदर्शक आणि चाहते आहेत. आज ७ जानेवारी रोजी त्यांचा वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा. )
Leave a Reply