ज्येष्ठ पत्रकार दिनेश केळुसकर यांचा जन्म ४ मार्च १९६८ रोजी झाला.
दिनेश केळुसकर यांची तळकोकणातील निर्भीड आणि अभ्यासू पत्रकार म्हणून आपली ओळख आहे. दिनेश केळुसकर यांनी इंजिनिअरींगचे शिक्षण घेऊनही आपण पत्रकारिता क्षेत्रात आपला वेगळा ठसा निर्माण केला. सुरवातीच्या काळात दिनेश केळुसकर यांनी वृत्तपत्रातील लिखाणाने आपण पत्रकारितेला केली. वृतपत्रात काम करताना सुरुवात त्यांना इलेक्ट्रॉनिक मिडियात काम करण्याची संधी मिळाली व त्यांनी ‘आयबीएन लोकमत’ या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे. कोकणासह राज्य, देशातीलही अनेक धांडसी विषयांचे कव्हरेज दिनेश केळुसकर यांनी केले आहे.
आपल्या पत्रकारितेने कोकणातील अनेक प्रलंबित प्रश्न आपल्या पद्धतीने वृत्तवाहिनीच्या माध्यमातून मांडून ते सोडविण्यास सरकारला भाग पाडलेत. त्या मुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातील पत्रकारांसमोर आपण आदर्श निर्माण केला आहात.
बातमी छोटी असो अथवा मोठी तिचे सादरीकरण कसे करावे हे दिनेश केळुसकर यांच्या कडून युवा पत्रकारांनी शिकण्या सारखे आहे. मोठे राजकारणी असो अथवा भागातील गरीब शेतकरी त्यांच्याशी दिनेश केळुसकर हे आपुलकीने संवाद साधतात. शेतकरी तसेच गरीब-गरजूंच्या मनातील व्यथा जाणून घेतात आणि मोजक्या व अचूक शब्दात मांडता.
या निर्भिड पत्रकारितेचा गौरव म्हणून जानेवारी २०२० मध्ये त्यांना रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघाने पत्रकार गौरव’ पुरस्काराने सन्मानित केले आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply