भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. अभिषेक मनु सिंघवी हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकिलांपैकी एक आहेत. अभिषेक मनु सिंघवी हे एक भारतीय वकील, राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत.अभिषेक सिंघवी हे पश्चिम बंगालमधून राज्यसभेचे सदस्य असून ते काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून काम करतात.
डॉ. अभिषेक मनु सिंघवी यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९५९ जोधपूर राजस्थान येथे मारवाडी कुटुंबात झाला. त्यांचे वडील लक्ष्मी मल्ल सिंघवी हे जैन इतिहास आणि संस्कृतीचे अभ्यासक होते. ते एक प्रसिद्ध वकील आणि ब्रिटनमधील भारताचे माजी उच्चायुक्त राहिले होते. अभिषेक मनु सिंघवी यांनी सेंट कोलंबिया स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी सेंट स्टीफन्स कॉलेज, ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिज आणि हार्वर्ड विद्यापीठात बीए (ऑनर्स), एमए, पीएचडी, जनहित याचिकांचा अभ्यास केला.
१९९७ मध्ये सिंघवी वयाच्या ३७ व्या वर्षी भारताचे सर्वात तरुण अतिरिक्त सॉलिसिटर जनरल बनले. २००१ नंतर ते काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते बनले आणि एप्रिल २००६ मध्ये राज्यसभेवर निवडून आले. सिंघवी सप्टेंबर २००६ ते सप्टेंबर २०१० या कालावधीत विशेषाधिकार समितीचे सदस्य होते. जुलै २०१२ नंतर त्यांना पुन्हा काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते बनवण्यात आले. अभिषेक मनु सिंघवी यांच्या पत्नी अनिता सिंघवी या गझल आणि सुफी गायिका आहेत.त्यांना अनुभव व आविष्कार ही दोन मुले आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply