प्राध्यापिका मृणालिनी परशुराम जोगळेकर यांचा जन्म १७ जुलै १९३६ रोजी झाला.
कुटुंबप्रधान लिखाणामुळे मराठी रसिकांच्या मनात तसेच साहित्यिक जगतात आपली वेगळी ओळख निर्माण करण्याच्या ज्येष्ठ साहित्यिका आणि विद्यार्थीपिय प्राध्यापिका मृणालिनी परशुराम जोगळेकर अभिरुचीसंपन्न मराठी साहित्याच्या निर्मिती जोगळेकर यांचे महत्वपूर्ण योगदान होते. दूरदर्शनवरील शरदाचे चांदणे’ आणि ‘सुंदर माझं घर’ या कार्याक्रमांतील ओघवत्या शैलीत केलेल्या सुत्र संचालनाद्वारे त्यांनी घराघरात ग्थान मिळविले होते. या कार्याक्रमांत ज्वलंत विषयांवर परिसंवाद चर्चाः साहित्यिकांच्या मुलाखती त्या घेत असत. उत्कृष्ट वक्त्या व कथाकथनकार असणाऱ्या जोगळेकरांचा विद्यार्थ्यांमध्ये साहित्याविषयी रुची निर्माण करण्यात हातखंडा होता. संध्याकाळचा चेहरा व रंग अमेरिकेचे प्रवासिनी आदी त्यांची माहित्यकृती मराठी रसिकांच्या मनांत घर करून राहिली. ‘संध्याकाळचा चेहरा’ या कादंबरीला राज्य शासनाचे कथासंग्रहासाठीचे प्रथम पारितोषिक मिळाले. ‘लोकसत्ता’ मध्ये त्यांनी प्रवासवर्णनावर आधारीत ‘प्रवासिनी’ या लेखमालिकेचे लेखन केले होते. तुकारामांचे फ्रेंचमधील अभ्यासक फादर दलरी यांचे चरित्रही लिहीले. अमरावती येथे महाविद्यालयीन शिक्षण घेताना मराठी विषयातील नैपुण्याबद्दल विद्यापीठाने सुवर्ण पदक देऊन मृणालिनी जोगळेकर यांना गौरविले होते. रेल्वेतील उच्चपदस्थ अधिकारी परशुराम जोगळेकर यांच्याशी विवाहबद्ध झाल्यावर त्यांनी बडोदा येथे शिक्षिका म्हणून नोकरी केली. पुढे मोनापूर आणि नंतर मुंबई येथे मराठी विषयाच्या प्राध्यापिका म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली.
विलेपार्ले येथील डहाणूकर वाणिज्य महाविद्यालयात त्यांनी मराठी वाडमय मंडळाची स्थापना केली होती. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ मोशन सायन्सेस’ या संस्थेसाठी १९ व्या शतकातील स्त्री मुक्तीच्या उदगात्या’ या विषयावर पंडिता रमाबाई रानडे, जनाक्का शिंदे व ताराबाई शिंदे या कर्तत्ववान महिलांच्या कार्याचा अभ्यास करून मंशोधनात्मक लिखाणही केले होते. मुंबईतील सेवानिवृत्तीनंतर त्या पुण्यात स्थायिक झाल्या होत्या. सुपसिद्ध गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर या त्यांच्या स्नुषा आहेत. ‘स्त्री मुक्तीच्या महाराष्ट्रातील पाऊलखुणा’, ‘स्त्री अस्मितेचा आविष्कार’, ‘स्त्री मुक्तीच्या उद्गात्या’, ‘संध्याकाळचा चेहरा’, ‘मनवेळा’, ‘मृगतृष्णा’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.
मृणालिनी जोगळेकर यांचे ३१ मार्च २००७ रोजी निधन झाले.
Leave a Reply