जन्म.२५ फेब्रुवारी १९३३
वर्तक कुटुंबाचा तपकीर बनवण्याचा पिढीजात व्यवसाय होता. मात्र व्यवसायात स्वत:ला झोकून न देता वर्तक यांनी पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून एम. बी. बी. एस.ची पदवी संपादन केली. प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन या विषयामध्ये एम.डी. केल्यावर त्यांनी शल्यचिकित्सा विषयाचा अभ्यास केला. ससून रुग्णालय, टिळक आयुर्वेद महाविद्यालय आणि शेठ ताराचंद रामनाथ हॉस्पिटल येथे शल्यविशारद म्हणून त्यांनी काम केले. १९५९ मध्ये त्यांनी स्वत:चे विष्णुप्रसाद नर्सिंग होम सुरू केले. मात्र काही काळ वैद्यकीय व्यवसाय केल्यानंतर डॉ. प. वि. वर्तक यांनी रामायण आणि महाभारताचे संशोधन हेच कार्यक्षेत्र निवडले. ऋग्वेद, महाभारत आदी ग्रंथांचा अभ्यास करून त्यांनी रामायणाचा काळ ठरवला. रामामध्येही दोष होते असे मत त्यांनी मांडले. संशोधनात्मक अभ्यासातून त्यांनी ’वास्तव रामायण’ हा ग्रंथ लिहिला. त्यांचा ’महाभारता’वर आधारित ’स्वयंभू हा ग्रंथही प्रसिद्ध आहे.
सूक्ष्म देहाने मंगळावर व गुरूवर जाऊन त्यांनी तेथील माहिती अवकाशयानांनी मिळविण्याची आधीच प्रसिद्ध केली, असे म्हटले जाते. त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये ‘ सायंटिफिक डेटिंग ईन महाभारत वॉर, उपनिषदांचे विज्ञाननिष्ठ निरूपण – भाग १ आणि २, गीता – विज्ञाननिष्ठ निरूपण, तेजस्विनी द्रौपदी, संगीत दमयंती परित्याग, दास मारुती नही, वीर हनुमान! (हिंदी),दास मारुती नव्हे, वीर हनुमान ! (मराठी), पहिले आणि एकमेव स्वातंत्र्यवीर सावरकर, पातंजल योग या पुस्तकांचा समावेश आहे.
प. वि. वर्तक यांचे २९ मार्च २०१९ रोजी निधन झाले.
Leave a Reply