संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक व संशोधक डॉ. वालमंजुळ यांचा जन्म १७ जून १९३५ रोजी झाला.
मूळचे पंढरपूरचे असलेले प्रसिद्ध प्राच्यविद्या संशोधक वासुदेव लक्ष्मण मंजूळ उर्फ डॉ. वा. ल. मंजुळ यांचं नाव मोठ्या आदराने, सन्मानाने घेतलं जातं. वा. ल. मंजूळ यांचे या क्षेत्रातील योगदान लक्षणीय आहे. त्यांचे शिक्षण बी.ए. संस्कृत, एम.ए.मराठी आहे तर साताऱ्याचे संतकवी कृष्णदयार्णव यांच्यावर पीएच.डी. केली आहे.
भांडारकर प्राध्यविद्या संशोधन संस्थेच्या ४० वर्षांच्या सेवेत २८ वर्षे मुख्यपालपदाची धुरा त्यांनी सांभाळली. अनेक देशी विदेशी शोध प्रकल्पांना विद्वानांच्या संशोधनाला त्यांनी सहकार्य केले. गावोगावी फिरून संस्थेसाठी तब्बल बारा हजार हस्तलिखिते दान स्वरुपात संकलित केली. अनेक प्रसंग्रह मिळवले. त्यांनी सुमारे २८ ग्रंथांचे लेखन-संपादन आजवर केले आहे. गेली काही वर्ष ते हस्तलिखित तज्ज्ञ म्हणून काम करत आहेत. पुण्यातील हस्तलिखितांची समग्र सूची तयार करण्याचा प्रकल्प त्यांनी हाती घेतला होता.
देशविदेशातल्या प्राच्यविद्येतल्या संशोधन करणाऱ्या अनेक विद्वानांशी त्यांचे मैत्रीपूर्ण, जिव्हाळ्याचे संबंध आहेत. देशोदेशातल्या हस्तलिखितांचा शोध घेणं, त्यांचे जतन आणि संवर्धन करणं तसेच त्यातील ज्ञान विशेषतः भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी त्या त्याअभ्यासकांना माहिती पुरवणं, त्यांची वेगवेगळ्या प्रकारे ओळख करून देणं अशी अनेक कामे ते अत्यंत दृढ सेवाभावाने करत आहेत.
‘नाथ संप्रदायाचा इतिहास व परंपरा’ हे डॉ. वा. ल. मंजूळ लिखित अभ्यासपूर्ण संदर्भ पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.
त्यांच्या या प्रदीर्घ आणि अनमोल कार्यासाठी कोशकार केतकर पुरस्कार, ग्रंथालीचा आस्थेवाईक ग्रंथपाल, पुणे मराठीग्रंथालयातर्फे आदर्श ग्रंथपाल, ऋग्वेद अभ्यासक, पुणे पुरस्कार, विधिलिखित ब्रह्मभूषण पुरस्कार, सेवा भक्ती पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ज्येष्ठ ग्रंथकार पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply