ज्येष्ठ तबलावादक हेमकांत नावडीकर यांचा जन्म ७ जूनला झाला.
हेमकांत नावडीकर हे मुळचे पुण्याचे. त्यांचे शालेय शिक्षण नुमवीत व महाविद्यालयीन शिक्षण एस.पी महाविद्यालयात झाले. हेमकांत नावडीकर यांनी आपले संगीताचे शिक्षण पं.जी. एल्. सामंत, पं. सदाशिव पवार, पं. अरविंद मुळगावकर यांच्या कडे घेतले. हेमकांत नावडीकर यांनी पं. भीमसेन जोशी यांच्यासारख्या महान, दिग्गज गायका बरोबरच अनेक मान्यवर कलाकारांना साथ संगत केली आहे. हेमकांत नावडीकर यांचे ‘नावडीकर म्युझिकल्स्’ नावाने वाद्य विक्री व वाद्य दुरुस्तीचा व्यवसाय आहे.
‘नावडीकर म्युझिकल्स्’ हे कलाकारांचे आवडते दुकान आहे. या व्यवसायात आल्यावर या संगीत क्षेत्रातील मुशाफिरीचा त्यांना खूपच उपयोग झाला. ‘नावडीकर म्युझिकल्स्’ या दुकानाला २५ हून अधिक वर्षे झाली आहेत.
हेमकांत नावडीकर यांनी २६ एप्रिल २०२० रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी ‘संगीत संवाद रेडिओ’ या ‘इंटरनेट रेडिओ’ला सुरवात केली आहे. संगीत संवाद या इंटरनेट रेडिओवर २४७ शास्त्रीय संगीत ऐकता येते. याला जगभरातून उत्तम प्रतिसाद लाभत आहे. श्रोत्यांकडून तर त्याला उत्तम प्रतिसाद आहेच, पण कलाकारांकडून ही उत्तमोत्तम ध्वनिमुद्रणे उपलब्ध करून देण्यात त्यांचाही खूप मोलाचा वाटा आहे.
संगीत संवाद रेडिओ ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply