नवीन लेखन...

शब्द बदलला की अर्थ बदलतो

गरीब माणुस दारु पितो.
मध्यमवर्गीय मद्यपान करतो..
तर श्रीमंत लोक ड्रिंक्स घेतात…!

काम केल्यावर गरीब माणसाला मजुरी मिळते.
काम केल्यावर मध्यमवर्गीय गृहस्थाला पगार मिळते..
तर काम केल्यावर ऑफिसर लोकांना सॅलरी मिळते…!

गरीब माणुस करतो ते लफडं.
मध्यमवर्गीय माणुस करतो ते प्रेम..
तर श्रीमंत व्यक्ती करतात ते अफेअर…!

शब्दा बरोबर शब्द मांडला की कविता होते.
शब्दाने शब्द वाढला की भांडण होते..
शब्दाने शब्द वाढत गेले की लेखकाची रॉयल्टी वाढते…!

आयुष्य हे सुंदर असतं
हे ज्याच त्याने ठरवायचं असतं

स्वप्न फरारीच बघायच का ?
अपना बजाज मधे सुख शाेधायचं…!

डिग्री घेऊन सुशिक्षित व्हायचे का ?
संस्कार जाेपासून सुसंस्कृत व्हायचे…!

आई वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवायची का ?
त्यांच्या उतार वयात वृध्दाश्रमाचा चेक फाडायचा…!

आयुष्य हे सुंदर असतं
हे ज्याच त्याने ठरवायचं असतं

स्वबळावर नवनवीन देश पादाक्रांत करायचे ?
मराठी पणाच्या चौकटीत स्वतःला जखडून ठेवायचं…!

What’s Up वर स्वत:चं मनोरंजन करायचं का ?
आपल्या सानुल्यासोबत सारीपाटात रमायचं…!

जोडीदारासोबत शरदाचं चांदण शिंपायच का ?
समाजाच्या जोखडीत वेळोवेळी मरांयच…!

आयुष्य हे सुंदर असतं
हे ज्याच त्याने ठरवायचं असतं

तिन्हीसांजा देव्हा-यात दिवा लावायचा का ?
विजय मल्याचा बिझनेस वाढवायचा…!

मनाच्या गाभा-यात रातराणी फुलवायची का ?
निवडुंगाचे कुंपण घालून विचार खुंटवायचे…!

जन्माला आलो म्हणून आयुष्य रेटायचं का ?
एकच जन्म आहे म्हणून आयुष्य जगायचं…!

आयुष्य हे सुंदर असतं
हे ज्याच त्याने ठरवायचं असतं

आयुष्य आईस्क्रीम सारखं आहे
टेस्ट केलं तरी वितळतं…!
वेस्ट केलं तरी वितळतं…!

म्हणुन आयुष्य टेस्ट करायला शिका…!
वेस्ट तर ते तसंही होतच आहे…!

पैशाने गरिब असलात तरी चालेल पण मनाने श्रीमंत रहा…!
कारण गरिबांच्या घरावर लिहलेल असतं सुस्वागतम्…!
आणि श्रीमंतांच्या घरावर लिहलेल असतं कुत्र्यांपासुन सावधान…!

टेन्शन घ्यायचंच नाही…
फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं…काही कमी पडत नाही…आणि फरक तर अजिबात पडत नाही…
कारण, नशीब(कर्म+संधि) कधी ही बदलु शकते….
“जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची…”
हा जन्म पुन्हा नाही

— भरत कानविंदे 

Avatar
About Guest Author 525 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..