शब्द माझा मोगरा, अन शब्द माझा पिसारा,
शब्द माझा बोलका,
नि तोच माझा किनारा,
तोलतो मापतो,वाटतो,
शब्दही सतत ‘झुंज’ देतो,
राखतो पूर्ण ताकदही,
सत्ताही पालटून देतो,—!!!
खेळतो खेळी कल्पनांची,
काव्यतुरेही तो खोवतो ,
राखतो बहुत अंतरे,—
नाना जिवांना सांभाळतो,–!!!
प्रकटे पण शब्दांतूनही,—
कितीक आकसनेमका,
तोच कधी जिंकून घेईल,
अनेक हृदय संपदा, –!!!
वाट दाखवी कधी,
वचन नित्य पाळतो,
‘दटावे’ कधी क्वचित,
गुरू होऊन सुधारतो,–!!!
शिस्त लावे ‘करडी’,
कठोर शिक्षणही देतो,
नेहमी जवळ घेऊनी,
आई बनुनी समजावतो,,–!!!
पित्यासमान हात देतो,
तरी जरब’ वाटते बालका,-!!
वडील बनुनी धावतो,–
प्रसंगी,येतो कसा रक्षणां,–!!!
मित्र म्हणून मदत करी,
धावतो बिकट संकटा,
नातेही सगळी जपताना,
न करी विचार थोडका,—
शेजारी होऊन सख्खा
सावलीगत पाठीराखा,–!!!
अनोळखी हात देई,
प्रसंग उद्भवता बांका,
अलगद बाहेर काढतो,
त्यांतून ठरवून नेमका,–!!!
शब्द नेतो देवाजवळी,
हृदयांतर करी सारखा,
, आपल्या माणसांसाठी,
प्रसंगी नशिबाला धडका,-!!
शब्दांवाचून सर्व “निर्धन”,
कवी त्याच्यावाचून पोरका,
शब्दच आमुचे अमोल रत्न,
बेलभांडार वाहते शब्दां–!!
©️ हिमगौरी कर्वे.
Leave a Reply