असतेस , सामोरी तूं जेंव्हा
मज काव्य ! प्रसवते तेंव्हा ।।धृ।।
मम भाळी गं हे दान ईश्वरी
सत्य , निर्मळी भावप्रीतीचे
अंतरी उधळीत येते शब्दब्रह्मा ।।१।।
गगन बरसता भाव कल्लोळांचे
मनहृदयीचे , अंगण सारे ओले
शब्द मत्तमयुरी गं नाचती तेंव्हा ।।२।।
गूढ सारांश , सकल जीवनाचा
निःशब्द जरी , मनी पाझरतो
उलगडते चराचरीचे गुपित तेंव्हा ।।३।।
तव सहवासाचे गं प्रीतचांदणे
मी माळीत जातो , शब्दांसंगे
चिरंतर , ते देवत्व भेटते तेंव्हा ।।४।।
व्योमात लागता , माझी समाधी
कानी , वेणू वाजवी श्रीरंगमुरारी
छुमछुमछुम नादती नुपुरे तेंव्हा ।।५।।
©️ वि.ग.सातपुते.(भावकवी)
दिनांक:- २२- ५-२०२१
Leave a Reply