ठिणगी पडूनी पेटे ज्वाला,
आकाशाला जाऊनी भिडती,
नष्ट करूनी डोंगर जंगल,
हा: हा: कार तो माजविती ।।१।।
शब्दांची ही ठिणगी अशीच,
क्रोधाचा तो वणवा पेटवी,
मर्मघाती तो शब्द पडतां,
अहंकार तो जागृत होई ।।२।।
सूड वृत्तीचा जन्म होवूनी,
वातावरण दूषीत होते,
संघर्षाचा अग्नी पेटूनी ,
जीवन सारे उजाड करीते ।।३।।
कारण जरी असे क्षुल्लक,
विनाश व्याप्ती होई भयकंर,
केवळ तुमचे प्रेमळ शब्द,
दुष्ट चक्र थांबवी सत्वर ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply