आम्ही लहानपणी ‘शाळे’त जायचो तर आताची मुलं ‘स्कुल’मधे जातात.
‘स्कुल’ शब्द जरी इंग्रजी वाटत असला तरी त्याची जन्मदात्री ‘संस्कृत’ भाषा आहे असं मला ठामपणे वाटतं. तसं इंग्रजी शब्दांच्या व्युत्पत्तीच्या शब्दकोषात इंग्रजी स्कुल शब्दाच्या लॅटीन schola, ग्रीक skhole, फ्रेन्च escole अशा अनेक व्युत्पत्ती स्पष्ट केलेल्या असल्या तरी मला जास्त पटलेली व्युत्पत्ती संस्कृतमधील आहे. ( मी ‘अ’संस्कृत असल्याने माझ्या एका ‘सु’संस्कृत मित्राशी या शब्दाच्या व्युत्पत्तीवर चर्चा केल्यानंतर हे लिखाण केलं आहे)
हा शब्द जन्मला हिन्दुस्थानात, लहानपणीच त्याला परदेशात दत्तक घेतला. संपुर्ण युरोप, अमेरिका इ. सारखे पृथ्वितलावरील आणखी भू-प्रदेश हिन्डून तो जेंव्हा हिन्दुस्थानात परत आला तेंव्हा या भुमीवर त्याचं प्रचंड स्वागत झालं. स्वागत करताना भारतीय जनतेला त्याचं परदेशी रुपडं खुप भावलं (परदेशी ते चांगलं असं मानण्याच्या आपल्या सवयीनुसार) व देशी जनतेने या शब्दाला आपलं बनवून टाकलं..
आता येवढं पाल्हाळ लावल्यावर आपलीही उत्सुकता हे समजायला जागी झाली असेल की तो मुळ भारतीय शब्द कोणता..!
तर, ‘स्कुल’ हा अस्सल परदेशी वाटणा्र्या शब्दाची जननी आपली संस्कृत भाषा असून या शब्दाचं हिन्दुस्थानातील पाळण्यातलं नांव ‘ऋषिकुल’ हे आहे !
आपल्या देशात विद्यार्थी तेंव्हा गुरूगृही राहून शिक्षण घेत. या पद्धतीवा ‘ऋषिकुल’ असं म्हणत. अनेक वर्षांपूर्वी हा ऋषिकुल शब्द व पद्धत परदेशी लोक आपल्या सोबत आपल्या देशात घेऊन गेले असावेत. काळाच्या ओघात व त्यांच्या उच्चार पद्धतीनुसार ऋषिकुलातील ‘ऋ’ शब्द गहाळ झाला आणि उरला ‘षिकुल वा सिकुल’. या उरलेल्या ‘सिकुल’ शब्द युरप / अमेरिकेत राहून-फिरुन ‘स्कूल’चं रुपडं लेवून परत आला आणि कोणतीही परदेशी गोष्ट उत्तमच असते या मानसीक गुलाम जनतेने त्याचं इथं प्रचंड स्वागत केलं. इतकं की, ऋषिकुला सारखी काहितरी ‘देशी’ भानगड या देशात होती व ‘स्कुल’ आल्यामुळे आता आपण तरलो गेलोय अशी तीची भावना होऊन तीनं ‘स्कुल’ला आपलंसं केलं..!!
— गणेश साळुंखे
9321811091
(ऋषीकुल या शब्दाशी फ्रेन्च, लाटीन व ग्रीक शब्दांशी असलेलं साधर्म्य हा या भाषांच्या भगिनीत्वाचा पुरावा आहे मी मानतो.)
नमस्कार.
छान व्युत्पत्ती.
– school of thought असा शब्दप्रयोग रूढ आहे. तोही या व्युत्पत्तीत बसतो.
– इंग्रजीत माशांच्या समूहाला school of fish असें म्हणतात. त्याचाही विचार करावा.
सस्नेह,
सुभाष स. नाईक