शब्दांविना संवादू,
असंभव”” तो वाटतो,
किमया त्यांची न्यारी”,
अर्थ मर्म दाखवतो,
शब्दांवाचून किती भाषा,
मानव नेमका वापरतो,
परंतु त्यांच्यासम हा ,
म्हणत म्हणत कसा,
वर्चस्व त्यांचे मानतो,–
स्पर्श बोले कधीकधी,
मात्र शब्दांसारखा,
तान्हुल्यांची खास सोय,
जाणे बाळ ममता, माय–!!!
, हाच स्पर्श जादू करे,
प्रेमभावना व्यक्त करे,–!!
आबालवृद्धां आधार वाटे ,
इतुका बोलका अगदी भासे,–
खाणा-खुणा करत लोक,
बोलती काही एकमेकांशी,
मूक सांकेतिक भाषा जणू,
मदत करे सार्थ अशी,–!!
चित्रलिपी केव्हातरी,
आंतरिक संवाद साधे,
मार्मिक प्रसंग रेखाटुनी,
हृदयांशी हृदये जुळवे,
कित्येक कलाही बोलती,
आत्मिक संवाद साधती,
खूण पटे आत्म्याला आत्मी, यथोचित अबोल भाषा साची,
नयनांची भाषा आगळी,
फक्त डोळ्यांमधुनी बोले,
कधी अनेक शब्द हारती,
असे भाव प्रदर्शित करे,–!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply