दुःखवेदनाच! सखी खरी।
आठवांतुनी, ओघळणारी।
निष्पाप मनांस सावरणारी।
शब्दसांत्वनीच, सहोदरी ।।१।।
दुःखाचे पावित्र्य! आगळे।
नाही सहजी, कुणा उमगले।
सुखदुःख योगच प्रारब्धी।
असे भोगणेच! ते जन्मांतरी ।।२।।
अनाहत लाठीच भगवंताची।
ऋणानुबंधीच, साऱ्या गाठी।
तोच जोडितो, तोच तोडितो।
जपावी! सत्कर्माची शिदोरी ।।३।।
जन्मा! येता रित्या ओंजळी।
जन्मांतीही, रित्या ओंजळी।
जन्मासोबती अटळच मृत्यू।
संचित! सोबतच सरणावरी ।।४।।
सत्य! एकमेव हेची जीवनी।
पुनरपी जननं, पुनरपी मरणं।
त्रिकालाबाधित सत्य सृष्टीचे।
ऋतुचक्र! अखंडित आजवरी ।।५।।
©️ वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. १०८.
१७ – ८ – २०२१.
Leave a Reply